नागरिकता कायद्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

jalgaon-digital
1 Min Read

जळगाव 

लोकसभा व राज्यसभेत नागरीकता संशोधन विधेयक बहुमताने पारीत केले. याचे रूपांतर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होउन त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे.

हे विधेयक नागरीकत्व देण्यासाठी आहे,  आम्ही करदाते असून या करावरच सरकार व कर्मचारी काम करतात, या पैशावर घुसखोर पोसले जावू नयेत यासाठी नागरीकत्व दुरूस्ती कायद्याच्या समर्थनार्थ भारत माता कि जय च्या घोषणा देत राष्ट्रीय सुरक्षा मंच, अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्था, विहिंप, कवयित्री बहिणाबाई मल्टीपर्पज संचलीत युवा ब्रिगेडीयर्स फाउंडेशन, जसलीन इंडोसर्जीकल्स आदी 23 संघटनातर्फे टॉवर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर नागरीकत्व सुधारणा कायदा समर्थन रॅली व सभा घेण्यात येवून प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे यांना निवेदन देण्यात आले.

या निवदेनात म्हटले आहे की,   पाकिस्तान, अफगाणीस्तान बांगला देशात अत्याचार पिडीत निर्वासितांना नागरिकत्व देण्यासंदर्भात लोकसभेत नागरीकता संशोधन अधिनियम पारीत केले. परंंतु आपला स्वार्थ साध्य करून हिसांचार पसरवित आहेत. या जाळपोळ आंदोलन निषेधामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होत आहे.

हिसांचार पसरविणार्‍या व्यक्ती व संघटनांवर गुन्हे नोंदीसह योग्य ती कारवाई करण्यात यावी,यामागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी खा.रक्षा खडसे, महापौर सीमा भोळे, आ. राजूमामा भोळे, डॉ.संजीव पाटील,  कैलास सोनवणे, सचिन नारळे उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *