कोथिंबीरला विक्रमी 18 हजार 500 रूपये भाव

0
नाशिक । नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरीला आज विक्रमी शेकडा 18 हजार 500 रूपयांचा भाव मिळाला. समतापुर, कळवण येथील शेतकरी विशाल सुमतीलाल भोये यांनी 400 कोथिंंबीरीच्या जुडया बाजार समितीत आणल्या होत्या.

पावसाळयामुळे बाजार समितीत केवळ 10 टक्केच कोथिंबीरची आवक झाल्याने त्यांच्या कोथिंबीरीला 185 रूपये प्रतिजुडी असा भाव मिळाला.

बाजार समितीतील भरत सूर्यवंशी यांच्या सुमांजली व्हिजीटेबल कंपनीने हा शेतमाल खरेदी केला. दोन दिवसांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत जुडीला 170 रूपये भाव मिळाला होता. परंतू आज त्याहूनही अधिक भाव देण्यात आला. विशाल भोये यांची कोथिंबीर चांगल्या दर्जाची होती.

याशिवाय पुरवठा कमी आणि मागणी जास्त वाढल्याने बाजार समितीत कोथंबिरीला विक्रमी भाव मिळाला. मागील दोन आठवडयापासून कोथिंबीरचा प्रचंड तुटवडा भासत असल्याने सरासरी भाव 10 हजारांच्या पुढे मिळत आहे.

त्यामुळे कोथिंबीर उत्पादक शेतकर्‍यांना ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र आहे. आणखी काही दिवस हे भाव चढेच राहणार असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली.

LEAVE A REPLY

*