अबब…नाशकात कोथिंबीर शंभर रुपये जुडी

0

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कोथिंबीरची जुडी शंभर रुपये दराने विक्री झाली. माडसांगवी येथील शेतकरी वैभव बर्डे यांनी दोनशे कोथिंबीरच्या जुड्या विक्रीसाठी आणल्या होत्या. या जुड्या दहा हजार रुपये शेकडा दराने विक्री झाल्यामुळे सगळीकडे कोथिंबीरच्या दाराची चर्चा आहे.

संपकाळात सर्वच बाजारसमित्या ओस पडल्या होत्या. आज नाशिक बाजारसमितीत सकाळपासून ५९ क्विंटल भाजीपाला आणि फळभाज्यांची आवक झाली. मागणी अधिक असल्यामुळे कोथिंबीरने चांगलाच भाव खाल्ला. जवळपास दहा हजार रुपये शेकडा दराने कोथिंबीर विक्री झाली. म्हणजे शंभर रुपयाला एक जुडी.

कोथिंबीर सोबतच शिमला मिरची, मुळाची किरकोळ आवक झालेली दिसून आली. सात दिवसांपासून आवक नसल्यामुळे कोथिंबीरच्या चार काड्या दहा रुपयांना मिळत होत्या. बाजरातील मागणी बघता नाशिक बाजार समितीत येणाऱ्या काळात आवक वाढण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. आज ज्या शेतकऱ्यांनी याठिकाणी माल विक्रीसाठी आणला त्यांना चांगला दर मिळाला.

LEAVE A REPLY

*