सिडको कार्यालय हलविण्याचा प्रकार मुख्यमंत्री कार्यालयामुळे पुन्हा थांबला

0

नवीन नाशिक (प्रतिनिधी):- नाशिकहून सिडकोचे कार्यालय हलविणार नाही असे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आल्यानंतररही त्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रकार आज नाशिक सिडको कार्यालयाकडून सुरू होता.

आज सकाळपासूनच वाळुंज (औरंगाबाद) येथील सिडकोच्या ट्रक मधून नाशिक कार्यालयातील फाईल व कागदपत्रांचे गठ्ठे रवाना करण्यास सुरुवात करण्यात आली होती.

मात्र ही बाब निदर्शनास येताच आमदार सीमा हिरे यांनी मुख्य प्रशासकांशी तसेच मुख्यमंत्री कार्यालयाशी  चर्चा केल्यानंतर सदर काम बंद करून कागदपत्रे न हलविण्याचे आदेश देण्यात आले.

त्यामुळे सकाळपासून भरलेली गाडी रिकामी करायला सुरुवात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*