Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

चौकीदार हि चोर हे ! वेबसाईटसाठी आमचे डिझाइन चोरले’

Share
हैदराबाद: भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटसाठी टेम्प्लेट चोरल्याचा आरोप आंध्र प्रदेशातील एका वेब डिझाईन कंपनीनं केला आहे. भाजपानं कोणतंही क्रेडिट न देता टेम्प्लेटची बॅकलिंक काढून टाकल्याचा आरोप डब्ल्यूथ्रीलेआऊट्सनं (W3Layouts) केला.

भाजपानं टेम्प्लेटसाठी कोणतंही क्रेडिट दिलं नाही. उलट त्याची बॅकलिंक मुद्दामहून काढून टाकली, असा दावा कंपनीनं केला. आपण तयार केलेलं टेम्प्लेट भाजपाकडून वापरलं जात असल्याचं पाहिल्यावर कंपनीनं ही बाब पक्षाच्या लक्षात आणून दिली. याबद्दल कंपनीनं त्यांच्या वेबसाईचवर एक ब्लॉगदेखील प्रसिद्ध केला.

आमच्या वेबसाईटवरील टॅम्पलेट कोणीही वापरू शकतो. मात्र ते वापरल्यानंतर वेबसाईटच्या शेवटी एक बॅक लिंक असते ज्यावरुन हे टॅम्पलेट कोणी तयार केले आहे हे समजते. भाजपाने आपल्या साईटवरून ही बॅक लिंकच काढून टाकली आहे. भाजपाच्या आयटी सेलला आमचे काम आवडले आणि त्यांनी आमचे टॅम्पेलट वापरल्यामुळे आम्ही खूप खूष होतो.

मात्र त्यांनी बॅकलिंक काढून टाकत या कामाचे श्रेय आम्हाला दिले नाही समजल्यानंतर आम्हाला धक्काच बसला. या टॅम्पलेटसाठी भाजपाने आम्हाला पैसेही दिले नाहीत आणि श्रेयही दिले नाही,’ असं कंपनीने या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

कंपनीने ट्विटवरून भाजपाला ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी कोणतीही दखल घेतली असा आरोपही या स्टार्टअप कंपनीने केला आहे. ब्लॉगच्या शेवटी ते म्हणतात, ‘आता भाजपाच्या आयटी सेलने वेबसाईटचे संपूर्ण कोडींग बदलले आहे. ज्या राष्ट्रीय पक्षाचा प्रमुख नेता स्वत:ला चौकीदार म्हणवतो तो पक्ष अशाप्रकारे दुसऱ्याचे काम कोणतेही सौजन्य न देता कसे चोरु शकतो असा प्रश्न आम्हाला पडला आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!