Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedचोपडा : दोन तरुण डोहात बुडाले

चोपडा : दोन तरुण डोहात बुडाले

वर्डी ता चोपडा –

येथील दोन तरुण डोहात बुडाल्याची घटना घडली .डोहात बेपता दोघे तरुणांचे उशिरा शोध कार्य सुरु होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की वर्डी येथील तीन तरुण चोपडा येथून कपडे खरेदी व बाजार करुन घरी येत असताना सांयकाळी सहा ते साडे सहा वाजे दरम्यान वडती फाटा व खरद फाटा मधील गुळ नदीच्या पुला खालील डोहात पोहण्यासाठी उतरले असता पाय घसरुन दिलीप केशव ढिवरे वय22 व सिध्दार्थ शिवाजी वय 21 हे तरुण बुडाल्याची घटना घडली तर त्यांच्या सोबत असलेला विनोद प्रकाश कांबळे हा तरुण पोहण्यास न उतरल्याने बचावला व सदर घटनेची माहीती दिल्यावर सदर घटना समोर आली.

- Advertisement -

रुखणखेडाचे पोलीस पाटील अंकुश भिल्ल यांचा खबरी वरुन अडावद पोलीस स्टेशनाचे पी एस आय योगेश तांदळे,ए पी.आय प्रकाश भदणे, चोपडा पोलीस स्टेशन चे मनोज पवार सही पोलिस दाखल झाले .

बुडालेल्या तरुणांचा उशिरा पर्यंत शोध कार्य सुरु होते. पाण्याचा प्रवाह व अंधारामुळे शोध कार्य थांबविण्यात आले. घटना स्थळी उप पोलीस अधिकारी (डि वाय एसपी )सौरभ कुमार अग्रवाल यांनी देखील भेट देवुन घटनेची माहीती घेतली .

पाण्याचा प्रवाह व अंधारामुळे शोध कार्य थांबविले

दोन दिवसापासुन गुळ प्रकल्प धरणातुन गुळ नदीत (पाण्याचे आवर्तन ) पाणी सोडण्यात आलेले असल्याने पाण्याचा प्रवाह जोरात होता व अंधारामुळे बुडालेल्या तरूणांच्या  शोध कार्या अडचण येत असल्याने, शोध मोहीम थांबविण्यात आली. गुळ प्रकल्प वरील पाणी सोडण्याचे बंद करण्याचे आदेश देण्यात आला व सकाळी बुडालेले तरुणांचा शोध घेण्यात येईल असे सांगण्यात आले.
- Advertisment -

ताज्या बातम्या