Type to search

जळगाव फिचर्स

चोपड्यात पोलिसाने घेतला गळफास

Share

चोपडा

येथील शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचार्‍याने शहरातील राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.संबंधित पोलिसाच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कॉन्स्टेबलपदावर कार्यरत पंकज मोहन पाटील (वय 28, रा.प्रसादनगर, चोपडा) यांनी दि. 20 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आपल्या भाड्याच्या घरात छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सदर प्रकार उघडकीस येताच त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉ. पवन पाटील यांनी त्यांना मयत घोषित केले. पो.कॉ.पंकज पाटील हे मूळचे गाढोदा (ता.जळगाव) येथील रहिवासी असून, सध्या ते चोपडा शहरातील प्रसादनगर भागात भाड्याच्या घरात राहत होते.

कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केल्याची शहरात दबक्या आवाजात चर्चा आहे. याबाबत डॉ. पवन पाटील यांच्या खबरीवरून शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!