Type to search

जळगाव

चोपडा येथे श्रीमद भागवत कथेचे आयोजन

Share

चोपडा (प्रतिनिधी) –

येथील राधे राधे परिवार यांच्या वतीने श्री श्री १००८ महंत स्वामी इंद्रदेवजी सरस्वती महाराज मथुरा निवासी यांच्या अमृतवाणीतून दि.२२ ते २८ ऑक्‍टोबर दरम्यान शहरात श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी चोपडा तालुक्यातील हजारो भक्तांनी उपस्थित द्यावी असे आवाहन राधे-राधे परिवार चोपडा यांनी केले आहे.

दि.२२ पासून ही कथा दुपारी दोन ते पाच या वेळेत बापूजी कॉम्प्लेक्स शेजारी यावल रोड वरील डॉ.सुरेश बोरोले यांच्या जागेत कथेचे आयोजन करण्यात आले असून या कथेला शहरातील महिला भगिनींनी आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे.

दि २२ रोजी सकाळी ९ वाजता बस स्टँड समोर हनुमान मंदिरापासून भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार असून दुपारी २ वाजता कथेला सुरुवात होणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!