अमेरिकेचे ‘चिनुक’ भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात

0
नवी दिल्ली – अमेरिकेचे अवजड मालवाहू हेलिकॉप्टर ‘चिनुक’ लवकरच भारतीय वायुसेनेमध्ये दाखल होणार आहे. या हेलिकॉप्टर्सची पहिली खेप गुजरातच्या मुंद्रा विमानतळावर आली आहे. २०१५ मध्ये भारत सरकारने हे विमान अमेरिकेकडून खरेदी केले होते. या हेलिकॉप्टरमुळे भारतीय वायुसेनेच्या ताकदीत वाढ होणार आहे.

भारतीय वायुसेनेच्या ताकदीत वाढ झाली आहे, कारण अमेरिकेच्या चिनुक हेलिकॉप्टर्सची पहिली खेप भारतात दाखल झाली आहे. गुजरातच्या मुंद्रा विमानतळावर चिनुक हेलिकॉप्टरची पहिली-वहिली बॅच पोहोचली. लवकरच हे चिनुक हेलिकॉप्टर्स भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

काय आहे ‘चिनुक’ – 
‘चिनुक’ हेलिकॉप्टर याला बोईंग सीएच-४७ म्हणूनही ओळखले जाते. अमेरिकी सैन्यातील अवजड माल वाहून नेण्यासाठी या हेलिकॉप्टरचा उपयोग केला जात होता. या हेलिकॉप्टरला पुढे आणि मागे मोठे पंखे आहे. हेच या हेलिकॉप्टरचे वैशिष्ट्य आहे. या पंख्यांमुळे प्रतिकुल हवामानातही या हेलिकॉप्टरचा वापर करता येतो.
हेलिकॉप्टरला मागे एक आणि साईडच्या दोन्ही बाजूंना दोन मोठे दरवाजे असल्यामुळे त्यात अवजड लष्करी वाहनेही वाहून नेता येतात. त्याच्या तळाला तोफा, चिलखती वाहने, जीप इत्यादी वाहून नेता येते. तर ताशी २६९ किमी वेगाने १२०० किलोमीटरचे अंतर सहज कापण्याची क्षमता या हेलिकॉप्टरमध्ये आहे. अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया, इजिप्त, ग्रीस, इटली, जपान, स्पेन, अर्जेंटीना या देशांकडेही चिनुक हेलिकॉप्टर्स आहेत.

LEAVE A REPLY

*