Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedPUBG आजपासून भारताबाहेर

PUBG आजपासून भारताबाहेर

नवी दिल्ली :

चीनी अँप पबजी मोबाइल (pubg mobile) आणि पबजी मोबाइल लाइट ही दोन्ही अँप आता भारतीय युजरला वापरता येणार नाही. ३० ऑक्टोबर २०२० पासून भारतात हे अँप बंद केले जात आहे.

- Advertisement -

कंपनीने फेसबूकवर यासंबंधीची माहिती दिली आहे. चीनी अँपच्या माध्यमातून भारतातील माहिती गोळा करत असल्याचा संशय भारत सरकारला होता. त्यामुळे महिनाभरापूर्वी भारताने ११८ अँपवर बंदी घातली होती. त्यामध्ये पबजी मोबाइल आणि पबजी मोबाईल लाइट या दोन्ही अँप प्लॅटफॉर्मचा समावेश होता.

टेन्संट गेम्स ही कंपनी या मोबाईल गेमची मालक आहे. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, ‘त्यांनी अँप बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल कंपनीला खूप दु:ख होत आहे. पबजी मोबाइल आणि पबजी मोबाईल लाइट या दोन्ही खेळांना भारतीय चाहत्यांनी आम्हाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. यूजरचा डाटा संरक्षित ठेवायला कंपनीने नेहमीच प्राधान्य दिले आहे. डेटासंबंधी भारतात ज्या काही नियम आणि अटी आहेत त्यांचे आम्ही कायमच पालन केले आहे. आमच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व युजरची गेम प्ले माहिती आम्ही पारदर्शकपणेच प्रोसेस केली आहे,’

- Advertisment -

ताज्या बातम्या