Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशचीनमधील लावा कंपनी भारतात करणार 800 कोटींची गुंतवणूक

चीनमधील लावा कंपनी भारतात करणार 800 कोटींची गुंतवणूक

सार्वमत

नवी दिल्ली – भारतात करण्यात आलेल्या धोरणात्मक बदलांनंतर चीनमधील मोबाईल उत्पादक लावा कंपनीने मोबाईल फोन विकास आणि उत्पादन वाढीसाठी पुढील पाच वर्षांत भारतात 800 कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तर कंपनीने चीनमधील आपला व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

वा इंटरनॅशनलकडून शुक्रवारी यासंदर्भातील माहिती देण्यात आली. उत्पादनाच्या डिझायिंनग क्षेत्रात चीनमध्ये कमीतकमी आमचे 600 ते 650 कर्मचारी आहेत. आम्ही आता हे काम भारतात नेले आहे. उत्पानांच्या विक्रीची आवश्यक ती गरज भारतातीलच कारखान्यातून पूर्ण केली जाईल. आम्ही यापूर्वी चीनमधून आमचे फोन जगभरात वितरित करीत होतो.

परंतु, आता आम्ही ते भारतातून करणार आहोत, अशी माहिती लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हरी ओम राय यांनी दिली. लॉकडाऊनच्या कालावधीदरम्यान आम्ही निर्यातीची मागणी चीनमधून पूर्ण केली. चीनला आपण मोबाईल निर्यात करावी हे माझे स्वप्न आहे. भारतीय कंपन्या यापूर्वीपासूनच चीनला मोबाईल चार्जरची निर्यात करतात. उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन योजना कंपनीच्या स्थितीतही बदल घडवेल. यासाठी आता संपूर्ण व्यवसाय भारतातूनच केला जाईल, असेही राय म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या