छिंदमच्या राजीनाम्याशी काय संबंध?

0

दिलीप गांधींचे उत्तर : दुकानदारीसाठी शिळ्या कढीला ऊत

अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजपचा निलंबीत उपमहापौर श्रीपाद छिंदमचा राजीनामा मी महापालिकेत पोहच केलेला नाही. त्याच्याकडून पक्षाचा राजीनामा घेत विषय तेथेच संपविला. उपमहापौर पदाचा राजीनामा हा त्याचा व्यक्तीगत विषय आहे. उपमहापौर पदाचा राजीनामा तो माझ्याकडे कसा देईल, तोच महापालिका प्रशासनाला देणार होता, असे सांगत गांधी यांनी छिंदम राजीनामा प्रकरणावरून उठलेल्या गदारोळ प्रकरणात हात वर केले आहेत. शिवसेनेचा नामोल्लेख टाळत काही लोक राजकीय फायदा व दुकानदारीसाठी तो विषय उकरून काढत असल्याबद्दल गांधी यांनी खंतही व्यक्त केली.

तिरंगा यात्रेची माहिती देण्यासाठी नगर येथे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्षाचे पदाधिकारी श्रीकांत साठे, किशोर बोरा, नगरसेवक किशोर डागवाले, सुवेंद्र गांधी,सागर गोरे यावेळी उपस्थित होते. छिंदमच्या राजीनाम्याचा विषय छेडल्यानंतर गांधी म्हणाले, त्याने उपमहापौर पदाचा राजीनामा माझ्याकडे देण्याचे कारण नाही. तो राजीनामा महापालिकेत कोणातरीमार्फत पोहच करणार होता. माझ्याकडे त्याने पक्षाचा राजीनामा दिला. आम्ही म्हणजे छत्रपतींचा आदर करतो. त्याने केलेले वक्तव्य हे निंदनीय आहे. काही लोक आपली दुकानदारी चालू राहावी, त्याचा राजकीय फायदा व्हावा यासाठी तो विषय उकरून काढत आहे. लोकांना वाईटांपेक्षा फायद्याचं काहीतरी दिलं पाहिजे. पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. त्याच्याकडून पक्षाचा राजीनामा घेतला त्याच दिवशी छिंदम नावाचा विषय संपला. शहरातील जनता समजदार आहे. ते निवडणुकीच्या काळात दूध का दूध अन् पाणी का पाणी करतील असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकीत महापालिकेत महापौर अन् उपमहापौर भाजपचाच होईल असा दावाही गांधी यांनी केला.

महासभेचा इतिहास
महापालिकेच्या इतिहासात एका अजेंड्यावर तीन दिवस महासभा चालण्याचा इतिहास नोंदला गेला. महासभेत उड्डाणपुलासाठी जमीन संपादनाच्या विषयाला मंजुरी द्यायची होती. शासन 70 टक्के तर 30 टक्के महापालिकेला द्यायचे होते. त्यातून शहरात उड्डाणपुलासाठी 300 कोटी रुपये मिळणार होते. पण महासभेत चर्चा एक अन् ठराव दुसराच असा प्रकार घडला. ठराव करताना महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्याने शासनाने तो खर्च उचलावा, असा उल्लेख करून शेवटी शासन अध्यादेशानुसार कार्यवाही करावी असे लिहिले गेले. आर्थिक परिस्थितीचा उल्लेख करण्याची ठरावात काहीच गरज नव्हती असे सांगत खासदार गांधी यांन नाराजी व्यक्त केली.

15 ऑगस्टपासून तिरंगा रॅली
खासदार गांधी यांच्या नेतृत्वाखाली नगर शहर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 15 ऑगस्टपासून तिरंगा रॅली निघणार आहे. 31 तारखेला राहुरी-नगर विधानसाा मतदारसंघात रॅलीचा समारोप होणार आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते रॅलीस हिरवा झेंडा दाखवून 15 तारखेला सुरूवात होईल. त्यादिवशी रॅली नगर शहरातील प्रत्येक रस्त्याने जाणार आहे. त्याचदिवशी रॅली शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांना अभिवादन करणार आहे. रॅलीत दोनशे मोटारसायकल, उघडी जीप असणार आहे. प्रत्येकाच्या गळ्यात तिरंगा पंचा, मोटारसायकला ध्वज असेल. राष्ट्रभक्ती दृढ करण्यासाठी ही रॅली निघणार आहे. ग्रामीण भागात रॅली गेल्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान केला जाईल. तसेच केंद्र व राज्य सरकारी योजनांच्या लााार्थ्यांचाही सत्कार केला जाणार आहे.

सेनेचे दिगंबर ढवण गांधींच्या दारात
शिवसेनेपासून दुरावलेले शहर उपप्रमुख तथा नगरसेविका शारदाताई ढवण यांचे मिस्टर दिगंबर (महाराज) हे आज पत्रकारांसमक्ष दिलीप गांधींच्या दारात पोहचले. वॉर्ड विकास कामाविषयी आल्याचे सांगत ढवण यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.मात्र आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर खासदार गांधी यांनी ढवण यांना पेढा भरवत स्वागत केले. एकूणच ढवण हे आता भाजपात जाणार हे स्पष्ट झाले. खासदार गांधी यांनीही अनेकांचा प्रवेश होणे बाकी असल्याचे सांगत तसे संकेत दिले.

 

LEAVE A REPLY

*