छिंदमची सीसीटीव्ही पाळत

0

घर, कार्यालय परिसरात लावले कॅमेरे, सुरक्षेसाठी घेतला निर्णय

अहमदनगर (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यानंतर उठलेल्या गदारोळामुळे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे जीणे हराम झाले आहे. जीवाला धोका असल्याने स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी घर, ऑफिस परिसरात त्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्याचे सर्व्हर स्वत:च्या ऑफिसमध्ये ठेवले आहे. सुरक्षेसोबतच हल्लेखोरांवर या कॅमेर्‍यांद्वारे पाळत ठेवण्याचा त्याचा मनसुबा आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी पोलिसांत छिंदम विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याचवेळी शिवप्रेमींनी छिंदमच्या घर, ऑफिसवर दगडफेक केली होती. जामीन मिळाल्यानंतर सुटका झालेल्या छिंदमने दगडफेक करणार्‍यांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे शिवप्रेमी चिडले. छिंदमला नगरमधूनच नव्हे तर राज्यातून हाकलून लावा या मागणीसाठी नगरमध्ये शिवसन्मान मोर्चा निघाला. त्यावेळी छिंदम सुरक्षित नसल्याची बाब हेरून पोलिसांनी त्याच्या घराभोवती सुरक्षेची कुंपन घातले. मोर्चाची धग कमी करण्यासाठी त्याला 15 दिवसांकरीता जिल्हाबंदी करण्यात आली. मात्र तरीही शिवप्रेमींचा रोष कमी झालेला नाही.

दगडफेक करणार्‍यांविरोधात छिंदमने गुन्हा दाखल केल्याने रोषात आणखीच भर पडली आहे. अनेक ठिकाणी आंदोलने, मोर्चे निघत आहेत. सुरक्षेला धोका असल्याने सुरक्षितेसाठी छिंदमने ऑफिस, घरासमोरच्या पटांगणात सीसीटिव्ही बसविण्याचे काम सुरू केले आहे. या सीसीटिव्हीचे सर्व्हर त्याच्याच ऑफिसमध्ये केले आहे. त्यामुळे छिंदमच्या घर, ऑफिसभोवती कॅमेर्‍याचा वॉच राहणार आहे. घर ते ऑफिस दरम्यानच्या रस्त्यावर इतरांच्या इमारतींवर हे कॅमेरे बसविण्यात आले आहे.

चर्चेचे पीक जोमात

छिंदम आता महापालिका निवडणुकीबाहेर फेकला गेला. तो निवडणूक लढविणार नाही. काही झाले तरी तो अपक्ष म्हणून महापालिकेची निवडणूक लढविणार आहे. त्याला नेत्यांचा आजही पाठींबा आहे. समाजामुळे त्याला नेतेमंडळी वार्‍यावर सोडणार नाही अशा एका ना अनेक चर्चा नगरमध्ये सुरू आहे.

तरीही छिंदमचे धाडस
छिंदमला नगरमधून कायमचा हद्दपार करण्यासाठी शिवसेना सरसावली होती. शिवप्रेमींनी त्याला राज्यातून बाहेर हाकला अशी मागणी करत मोर्चाही काढला. मात्र छिंदम या सगळ्या घडामोडीनंतर नगरमध्ये येतोय. त्यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. भाजपातून हकालपट्टी झाल्याने छिंदमचा राजाश्रय गेला. तरीही तो स्वत:च्या धाडसावर नगरमध्ये येतो, हेच नगरकरांना रूचत नाही.

 

 

LEAVE A REPLY

*