Type to search

चीनकडून पाकिस्तानला जाणारी हवाई वाहतूक बंद

देश विदेश मुख्य बातम्या

चीनकडून पाकिस्तानला जाणारी हवाई वाहतूक बंद

Share
नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. भारताने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलिच कोंडी केली आहे. अनेरिकेनेही पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. आणि आता चीनने देखील पाकिस्तानची साथ सोडली आहे. चीन आणि पाकिस्तानमधील हवाई वाहतूक चीनकडून पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच, चीनकडून पाकिस्तानला जाणारी विमानं रद्द करण्यात आली आहेत.

आखाती देशांमधील अनेक विमानं पाकिस्तान आणि पाकिस्तान-भारत सीमारेषेवरुन उड्डाणं करतात. या सर्व विमानांना चीनला जाण्यासाठी मार्ग बदलावा लागत असून भारत, म्यानमार किंवा मध्य आशियाच्या हवाई हद्दीतून प्रवास करावा लागत आहे अशी माहिती सिव्हिल एव्हिएशन एक्स्पर्टने दिली.

भारताने केलेल्या हवाई हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर सुषमा स्वराज यांनी वँग यांच्याशी चर्चा केली. हल्ल्यानंतर चीनने मंगळवारी असे म्हटले होते, की भारत व पाकिस्तान यांनी संयम पाळणे आवश्यक आहे. दोन्ही देशांतील शांततापूर्ण संबंध हे दक्षिण आशियाच्या स्थिरतेसाठी महत्त्वाचे आहेत. आता चीन नेमकी पाकिस्तानबाबत काय भूमिका घेतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यानंतर चीनने पाकिसत्नानला आता दणका दिला आहे.

 

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!