Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

भुईकोट किल्ल्यात बालदिनी अवतरले 277 ‘पंडित नेहरू’

Share

‘मै भी नेहरू’ उपक्रमात आठ महिन्यांच्या चिमुकल्यापासून ते 75 वर्षांच्या आजोबांपर्यंत सहभाग

अहमदनगर (प्रतिनिधी) – भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त देशभर साजरा होणार्‍या बालदिनानिमित्त विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवणार्‍या जी. एस. ढोरजकर फाउंडेशनच्या वतीने नगरच्या भुईकोट किल्ल्यात 277 विद्यार्थ्यांनी पंडित नेहरूजी यांच्या वेशभूषेमध्ये सहभागी होऊन, ‘मै भी नेहरू’ या उपक्रमाव्दारे आदरांजली अर्पण केली. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे 8 महिन्यांच्या चिमुकल्यापासून ते 75 वर्षांच्या आजोबांनी वेशभूषा करत नेहरूजी यांच्यावरील प्रेम व्यक्त केले.

किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारा पासून ते पंडित नेहरूजी यांच्या कक्षापर्यंत हे बालनेहरू व त्यांचे पालक यांच्या सहभागातून आयोजित फ्रीडम रॅलीला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते डॉ.अमोल बागुल यांच्या हस्ते हिरवे निशाण फडकावून प्रारंभ झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मेजर जोगिंदर सिंग, इतिहास संशोधक नवनाथ वावळ, सीताराम ढोरजकर, भूषण देशमुख, प्राचार्या आकांक्षा ढोरजकर, सामाजिक कार्यकर्ते शाम असावा, उद्योजक गिरीश मुळे, संतोष कानडे आदी उपस्थित होते.

डिस्कवरी ऑफ इंडिया -भारताचा शोध या ग्रंथाची प्रतिकृती व गुलाबाचे फुल हातामध्ये धरत भारत माता की जय, वंदे मातरम, चाचा नेहरू जिंदाबाद अशा घोषणांनी किल्ला परिसर दुमदुमून गेला. पंडित नेहरू यांच्या कक्षासमोर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायल्यानंतर त्यांना आदर्श ढोरजकर यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. पालक व शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी स्वतः स्वच्छता अभियान राबवून वृक्षारोपण देखील केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पाटोळे यांनी केले तर आभार वैष्णवी ढोरजकर यांनी मानले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!