Type to search

आरोग्यदूत फिचर्स

आरोग्यदूत : शाळकरी मुले नशेच्या आहारी

Share

वय वर्षे दहा ते एकोणिस म्हणजे आयुष्यात नवनवीन प्रयोग करण्याचा काळ, स्वतःची इमेज तयार होण्याचा काळ, नावीन्याचा ध्यास घेण्याचा काळ, स्वतःला सिद्ध करण्याचा काळ, रिस्क घेण्याचा काळ आणि सगळ्यात महत्त्वाचे आपली स्वतंत्रता सिद्ध करण्याचा काळ म्हणजेच पौगंडाव्यस्था.

त्याचमुळे व्यसनाच्या आहारी जाण्यातसुद्धा हाच काळ खूप महत्त्वाचा असतो. तंबाखू आणि दारूविषयी बरीच माहिती जनमानसात पोहोचली आहे, ही खरेच खूप चांगली गोष्ट आहे. पण आपण आज माहिती घेणार आहोत ती एका वेगळ्याच प्रकारच्या व्यसनाची. जे अगदी आपल्या डोळ्यांसमोर घडत असते; पण माहिती नसल्या कारणाने आपल्याला त्यातील गांभीर्य लक्षात येत नाही.

इन्हेलंट (खपहरश्ररपीं) म्हणजे नाकाने आणि तोंडाने वाफेद्वारे ओढता येणारे पदार्थ. उदा. दम्याची औषधे नाकातून आणि तोंडातून ओढली जातात. अशा प्रकारच्या बर्‍याच गोष्टी दैनंदिन जीवनात आपल्या आजूबाजूला असतात. अशा गोष्टीसुद्धा संभाव्य व्यसनाच्या असू शकतात, हे सांगूनही बर्‍याच जणांना पटणार नाही. पण ग्लू, पेंट, ड्रायक्लिनिंगचे केमिकल, स्टीकफास्ट, बॉण्ड, फेवीक्विक, गॅसोलिन किंवा इतर पेट्रोलजन्य वस्तू, हेअर-स्प्रे, डिओड्रंट, थिनर , नेलपेन्ट रिमोव्हर, आयोडेक्स आणि पर्मनंट मार्कर यांचाही वापर त्यांच्यातील काही केमिकलमुळे व्यसनासारखा केला जातो ही शास्रीयदृष्ट्या मान्य झालेले आहे. यालाच इन्हेलंट ऍब्युझ (खपहरश्ररपीं -र्लीीश) म्हणतात. त्याचीच आज आपण माहिती घेणार आहोत. निमित्त आहे काल वर्तमानपत्रात आलेली ही बातमी. शाळकरी मुले बाँड नशेच्या आहारी !

भारतातील सर्व्हेनुसार व्यसन करणार्‍यांपैकी 13% हे 20 वर्षांखालील मुले आहेत. डॉक्टरांना भेटायला येणार्‍या 63 % व्यसनाचा आजार असणार्‍या व्यक्तींनी हे मान्य केले आहे की, त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षांपासून व्यसनाला सुरुवात केली आहे. जसे जसे एखाद्याचे वय वाढत जाते तसे त्याचे व्यसनाच्या आहारी जाण्याची शक्यता कमी होत जाते. त्यामुळे व्यसनाच्या बाबतीतला हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे आणि याच्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कारण या वयात चालू झालेले व्यसन मेंदूच्या वाढीवरसुद्धा परिणाम करते आणि त्यामुळे त्या मुलाच्या आयुष्यावरती याचे दूरगामी परिणाम होतात. या वयातील मुलांमध्ये अनुक्रमे तंबाखू, दारू, इन्हेलंट आणि गांजा यांचे व्यसन सगळ्यात जास्त असते.

संशोधन असे सांगते की, सरासरी वयाच्या 12 ते 13 वर्षांपासून इन्हेलंटचे व्यसन चालू होते, पण अगदी वयाच्या पाच ते सहा वर्षांपासूनदेखील याची सुरुवात होते आणि पंधराव्या वर्षी याचे सर्वात जास्त प्रमाण असते. याच व्यसनाचे पुढे दारू आणि तत्सम आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या व्यसनांमध्ये रूपांतर होते. म्हणून इन्हेलंट ऍब्युझला गेटवे ड्रगसुद्धा म्हणतात.
इन्हेलंट ऍब्युझ (खपहरश्ररपीं -र्लीीश) म्हणजे मुद्दामहून चांगले वाटते म्हणून वर उल्लेख केलेल्या पदार्थांचा केलेला वारेमाप वापर. हा समाजातील सर्व स्तरातील मुलांमध्ये दिसून येतो. मुला-मुलींमध्ये याचे प्रमाण सारखेच आहे. सहज, स्वस्त आणि कायद्याने मान्यता असलेले असे हे पदार्थ असतात. त्यातच बरेच शैक्षणिक क्षेत्रात रोजच वापरात येतात. त्यामुळे याचे प्रमाण वाढतच चालले आहे. हे पदार्थ पटकन लपवता येतात, झटकन काम होते आणि आलेली झिंग दहा ते पंधरा मिनिटांत निघून पण जाते आणि हे पदार्थ व्यसनासाठी वापरले जाऊ शकतात, याची पुसटशी ही कल्पना पालकांना नसते. मुलांमधील महत्त्वाचा तरी लपून राहिलेला असा आजार आहे. याच्यामुळे मुलाच्या वाढीवर आणि बुद्धीवर म्हणजेच मेंदूवर अनिष्ट परिणाम होतात.

हे पदार्थ घेण्याच्यासुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत.डायरेक्ट अ‍ॅप्लिकेशन (ऊळीशलीं अिश्रिळलरींळेप) म्हणजे नाकात किंवा तोंडात उडवणे, बोटाला किंवा शर्टाच्या कॉलरला लावणे आणि त्याचा वास घेणे.

 

बॅगिंग (इरससळपस) म्हणजे पेपर किंवा प्लास्टिकच्या पिशवीत तो पदार्थ उडवून त्यातून नाकाने आणि तोंडाने हवा आत घेणे.

 

हफिंग (र्कीषषळपस) म्हणजे या पदार्थाने भिजवलेला कपड्याचा तुकडा तोंडामध्ये ठेवणे.

 

स्निफिंग (डपळषषळपस) म्हणजे तो पदार्थ कंटेनर (त्याच्या पॅकिंग) मध्ये असतानाच त्याचा नाकाने वास घेणे.

 

जवळ जवळ हजारभर तरी असे पदार्थ आहेत जे अशा प्रकारे वापरले जाऊ शकतात आणि लोक वापरतदेखील आहेत. हे पदार्थ वापरले जातात त्याला कारणीभूत असणारी केमिकल प्रामुख्याने टोल्युन (ढेर्श्रीशपश) टोल्युन, फ्युएल आणि नायट्रस ऑक्सिड या प्रकारची असतात.

(ढेर्श्रीशपश) हे ग्लू, पंक्चर काढण्याचे सोल्युशन, पेंट, थिनर, पर्मनंट मार्कर, नेल पॉलिश रिमोव्हर आणि वेगवेगळ्या क्लीनर लिक्विडमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते आणि याच्यामुळेच या पदार्थांचा गैरवापर केला जातो. फ्युएल या केमिकल गटात ब्युटेन, क्लोरोफ्लूरो कार्बन याचा समावेश असतो. वापरलेल्या पदार्थांपैकी 3% वरती सांगितलेली केमिकल मेंदूमध्ये पोहोचतात.

हे व्यसन कसे ओळखावे.

पेंट किंवा ऑईलचे डाग अंगावर आणि कपड्यावर असणे.

केमिकलचा वास येणे.

तोंडाच्या आजूबाजूला चट्टे किंवा जखम तयार होणे.

वारंवार नाकातून पाणी वाहणे.

डोळे लाल राहणे.

डोळे भिरभिरने. 

दोन दोन गोष्टी दिसणे. 

नखांवरती डाग पडलेले असणे.

वागण्यात आणि बोलण्यात खालीलप्रमाणे फरक पडू शकतो.

झिंगल्यासारखे दिसणे.

चक्कर येणे, तोल सांभाळता न येणे.

जीभ जड वाटणे किंवा बोलणे अडखळत होणे.

गोष्टी विसरणे आणि एकाग्रता कमी होणे.

भूक न लागणे किंवा मळमळ उलटी होणे.

चिडचिड होणे.

झोप खराब होणे.

अशा या माहिती नसलेल्या व्यसनामुळे अचानक मृत्यूसुद्धा येऊ शकतो. शरीरातील असा एकही अवयव नाही की ज्याचे या पदार्थांमुळे नुकसान होत नाही. प्रामुख्याने हृदय, त्वचा, अन्नपचन संस्था, रक्त तयार होणे, श्वसनसंस्था, किडनी यांच्याबरोबर सगळ्यात जास्त नुकसान होते ते मेंदू या अवयवाचे. मेंदूतील नुकसान हे खरेच खूप भयानक असते, यामध्ये मेंदूचा आकार कमी होतो (इीरळप -ीीेंहिू). सगळ्यात महत्त्वाचे हे नुकसान परत भरून येणारे नसते. त्यामुळेच याचा त्या मुलाच्या आयुष्यावर परिणाम होतोच होतो.

तरी वरील काही लक्षणे तुम्हाला तुमच्या घरात किंवा परिसरातील मुलांमध्ये दिसली तर ती दुर्लक्षित करू नका. योग्य वेळी मनोविकारतज्ज्ञांना भेटा आणि पुढील गुंतागुंत टाळा.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!