शौचालयाच्या टाकीत पडून बालिकेचा मृत्यू; चांदवड तालुक्यातील घटना

0
चांदवड| सोग्रस ता. चांदवड येथील आकाशवीर कंपनीच्या नविन बांधलेल्या शौचालयाच्या टाकीत पडून तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली.

येथील आकाशवीर कंपनीत मध्यप्रदेशातील वाहिर्‍या बरडे हे कामास आहे. त्यांची रहावयाची खोली देखील जवळ असून पालकांचे दुर्लक्ष होताच त्यांची मुलगी संजना बरडे ही शौचालयाजवळ खेळण्यास गेली व अचानकच ती टाकीत पडली.

तीला बाहेर काढून तात्काळ शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. मात्र संजनाचा गुदमरून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. दरम्यान, वडाळीभोई पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*