Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

संगमनेर: चिकणी पाणीप्रश्‍नी बेमुदत उपोषण मागे

Share

चिकणी (वार्ताहर)– संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील सरपंच शिवाजीराजे वर्पे यांनी आढळा धरणाचे ओव्हरफ्लोचे हक्काचे पाणी रुईसडा ओढ्याने डोंगरगाव ते राजापूर टेल पर्यंत सोडण्यासाठी बेमुदत उपोषण बुधवार दि. 18 सप्टेंबर रोजी सकाळी चिकणी ग्रामपंचायत समोर सुरू केले होते. या उपोषणाला कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे संरपंच वर्पे यांच्याबरोबर गुरुवार 19 सप्टेंबर रोजी चिकणी येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रभान काशिनाथ मुटकळे व संदीप विष्णू वर्पे हे देखील उपोषणास बसले होते. अखेर पाटबंधारे अधिकार्‍यांच्या आश्‍वासनानंतर उपोषण तिसर्‍या दिवशी मागे घेण्यात आले.

तिसर्‍या दिवशी ही उपोषण तीव्रतेने सुरूच होते. उपोषण कर्त्याची प्रकृती खालवू लागली आणि हे अंदोलन अधिकच तीव्र झाले. चिकणी येथील युवकांनी तर प्रशासन व पाटबंधारे विभागावर कडाडून टीकास्त्र सोडले. हे आढळेचे पाणी अधिकच तापल्याने पाटबंधारे विभागाचे अधिकारी श्री. देशमुख, जिल्हा परिषद सदस्य रामहारी कातोरे, थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, संतोष हासे, पंचायत समिती सदस्य विष्णूपंत राहटळ, पाटबंधारे विभागाचे अधिकारी श्री. कवडे यांनी थेट चिकणी गाठली.

बर्‍याच वेळाने यावर तोडगा काढत रविवारपर्यंत पाणी चालू ठेवून राजापूर टेलपर्यंत रुईसडा ओढ्याने आढळा धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात येईल असे आश्‍वासन पाटबंधारे विभागाचे अधिकारी श्री. देशमुख यांनी दिले. या आश्‍वासनाचे चिकणी, निमगाव भोजापूर, राजापूर ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले व सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संरपंच शिवाजीराजे वर्पे, चंद्रभान काशिनाथ मुटकळे, संदीप विष्णू वर्पे आदी उपोषणकर्त्यांना लिबूं पाणी देऊन उपोषण सोडविले.

यावेळी हरीभाऊ वर्पे, राजहंस दुध संघाचे संचालक विलासराव वर्पे, शाम्प्रो संगमनेर चे संचालक भारतराव वर्पे, सुकदेव वर्पे, राजेंद्र वर्पे, दत्तात्रय वर्पे, शिवाजी वर्पे, पांडुरंग वर्पे, भास्करराव वर्पे, साहेबराव वर्पे, आनंद वर्पे, रामभाऊ वर्पे, शिवाजी घुले, गोरक्ष वर्पे, सुनिल कडलग, उदय वर्पे, रामनाथ मुटकुळे, अ‍ॅड. आनंद सहाणे, संजय वर्पे, वैजुनाथ वर्पे आदिंसह चिकणी, निमगाव भोजापूर, राजापूर येथील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!