Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

संगमनेर: सरपंच वर्पे यांचे आढळा पाणीप्रश्‍नी बेमुदत उपोषण सुरू

Share

चिकणी (वार्ताहर)- संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील सरपंच शिवाजी वर्पे यांनी आढळा धरणाचे ओव्हरफ्लोचे हक्काचे पाणी रुईसडा ओढ्याने डोंगरगाव ते राजापूर टेलपर्यंत सोडण्यासाठी काल बुधवारी सकाळपासून चिकणी ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

रुईसडा हा या संपूर्ण भागाला संजीवनी देणारा पुरातन ओढा आहे. आढळा धरण ओव्हरफ्लो झाले की हा ओढा दुथडी भरून वाहत असे. डोगरगाव, चिकणी, निमगाव, भोजापूर, राजापूर आदी गावांतील निम्म्याहून अधिक शेतकर्‍यांना वर्षभर विहिरींना पाणी राहत असे. त्यामुळे येथील शेतकरी समृद्ध जीवन जगत होता. पण पाटबंधारे खात्याच्या चुकीच्या धोरणामुळे डोंगरगाव सोडता इतर गावांना पाणी येणे बंद झाले. यामुळे चिकणी, निमगाव भोजापूर, राजापूर येथील शेतकरी खूप त्रस्त आहेत.सलग दुष्काळी परिस्थितीचा सामना व ही समस्या लोकांना अतिशय वेदना देत आहे. म्हणून जोपर्यंत पाणी रुईसडा ओढ्याने खाली सोडत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरू राहील असे मत चिकणीचे सरपंच शिवाजी वर्पे यांनी दिली आहे. त्यांनी सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने तहसीलदार, पाटबंधारे विभाग, आमदार बाळासाहेब थोरात, पोलीस स्टेशन आदी ठिकाणी निवेदन दिले आहे.

जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, जिल्हा परिषद सभापती अजय फटांगरे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत राहटळ, पाटबंधारे विभागाचे श्री. कवडे, श्री. हारदे यांनी या अंादोलकांची भेट घेऊन यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. पण सरपंच शिवाजीराजे वर्पे यांच्या ठाम भूमिकेमुळे त्यांना अपयश आले. या अंदोलनासाठी चिकणी येथील सर्व संस्थाचे पदाधिकारी, नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!