राळेगणसिद्धी येथे मुख्यमंत्री उद्या करणार सौर कृषिवाहिनी प्रकल्पाचे भूमिपूजन

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – शासनाच्या ऊर्जा विभागातर्फे व महानिर्मितीच्या वतीने शनिवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता राज्यातील पहिल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचे भूमिपूजन जिल्ह्यातील राळेगणसिद्धी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

या सोबतच उत्पादन शुल्क विभागाच्या ग्रामरक्षक दलची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी सरपंच मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राहणार आहेत. या कार्यक्रमाला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख, जि. प. अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या दोन्ही कार्यक्रमांना खा. दिलीप गांधी, खा. सदाशिव लोखंडे, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. अरुण जगताप, आ. डॉ. अपूर्व हिरे, आ. शिवाजीराव कर्डिले, आ. विजय औटी, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. सौ. स्नेहलता कोल्हे, आ. मोनिका राजळे, आ. वैभव पिचड, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. संग्राम जगताप, आ. राहुल जगताप, पं. स. सभापती राहुल झावरे तसेज राळेगण सिध्दीच्या सरपंच रोहिणीताई गाजरे उपस्थित राहणार आहे.

या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व सरपंच नागरिक व शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंग, ऊर्जा प्रधान सचिव अरविंद सिंह, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी व जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*