मुख्यमंत्री घेणार समृध्दीचा आढावा; दर निश्चितीची प्रक्रिया सुरू

0

नाशिक : मुख्यमंत्रयांचा स्वप्नवत प्रकल्प असलेल्या नागपुर मुंबई समृध्दी महामार्गाबाबत आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा मुख्यमंत्री व्हिडीओ कॉम्फरन्सिंगव्दारे घेणार आहेत.

त्यामूळे याबाबत सविस्तर माहीती, गटनिहाय ठरविण्यात आलेले दर, झालेले सर्व्हेक्षण याची माहीती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

समृध्दी महामार्गास राज्यभर विरोध होत असतानाचा शासनाने जमीन खरेदीसाठी खासगी वाटाघाटीसाठी गटनंबर जाहीर करुन आता दर निश्चितीचीही प्रक्रीया सुरु केली आहे.

नागपूरमध्ये प्रथम दरांची निश्चितीची प्रक्रीया पार पडली असून वर्धा आणि ठाण्यातही प्रक्रीया सुरु आहे. सर्वाधिक विरोध होणा-या नाशिकमध्येही दरनिश्चिती करण्यात येत आहे.

राज्य शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई शिग्रदूरसंचार द्रुगती महामार्ग ऑक्टोबर 2019 साली पूर्ण करावायचा आहे.

आताच जमिन संपादनासह संपूर्ण प्रक्रीया पूर्ण करुन ऑक्टोबर 2017 पासून समृध्दी महामार्गाचे बांधकाम आणि निर्मितीच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

*