Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या राजकीय

ऑक्टोबरमध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री शपथ घेईल – खा. संजय राऊत

Share

मनमाड | बब्बू शेख

महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री कोण यावरून शिवसेना भाजपात कलगीतुरा सुरू असतांनाच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी येत्या ऑक्टोबरमध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईल असे सांगितले आहे. ते मनमाडला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत  होते.

खा. राऊत यांच्या वक्तव्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाबाबत दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर कुरघोडी करत आहेत.

एकीकडे भाजपचे नेते मुख्यमंत्रीपदावर आमचाच माणूस बसेल असे सांगत आहेत.  तर दुसरीकडे शिवसेना देखील मुख्यमंत्रीपदावर आपला दावा करू लागली आहे.

तिकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपर्यंत ‘आमचं ठरलं’ असे सांगत असतांना मात्र दोन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आमचाच होईल असा दावा करत आहेत. त्यामुळे अखेर सेना भाजपचे ठरलं तरी काय? अशी चर्चा आज संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर पून्हा सुरू झाली.

युवा सेनेने काढलेली जन आशिर्वाद यात्रा आज (दि. १९) मनमाड शहरात आल्यानंतर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या रूपाने महाराष्ट्राला युवा नेता मिळाला असून सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्याकडे आशेने पाहून महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची त्यांच्यात क्षमता असल्याचे सांगत एका प्रकारे आगामी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांचे नाव पूढे केल्याचे दिसून आले

आज आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली जन आशिर्वाद यात्रा मनमाडला येताच तिचे ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफी, दुष्काळ, मनमाडचा पाणी प्रश्न यासह विविध मुद्द्यांना हात घालत सर्व प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुहास कांदे यांनी करंजवन पाणी पुरवठा योजनेचा मुद्दा उपस्थित करून शासनाकडून लवकरात-लवकर ही योजना मंजूर करण्याबरोबरच निधी उपलब्ध करून देण्यात यावा, लोकवर्गणीची रक्कम माफ करण्यात यावी, यासह मनमाड व नांदगाव तालुक्यातील विविध समस्याअसून त्या सोडविण्याची मागणी केली असता आता तर प्रयत्न करूच त्यानंतर तुम्ही आमदार झाल्यावर समस्या मार्गी लावणार आहात असे आदित्य ठाकरे यांनी सांगून एका प्रकारे कांदे यांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब केले.

यावेळी मंचावर सर्वधर्मीय धर्मगुरू उपस्थित होते. त्यांनी मनोगत व्यक्त करून आदित्य ठाकरे यांना आशिर्वाद दिले यावेळी मंचावर राज्यमंत्री दादा भुसे, अरुण सरदेसाई, बापूसाहेब कवडे, उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, गटनेते गणेश धात्रक, मंगला भास्कर आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांचे तब्बल चार तास उशिराने आगमन झाले त्यानंतरही कार्यकर्ते उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी बाल वारकऱ्यांशी आस्थेने विचारपूस केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!