मुख्यमंत्री शिवराज सिंहांना अज्ञातांकडून धमकी ; २४ तासात आरोपी अटकेत

0
भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. ट्विटरच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. जितेंद्र अर्जुनवार आणि भरत अर्जुनवार असं आरोपीचं नाव आहे. त्या दोघांवरही सायबर क्राइमचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 24 तासांच्या आत या दोघांना शोधून काढलं आहे. त्याच्यावर कलम 506 आणि 507 च्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोपाळचे पोलीस अधीक्षक सुदीप गोयंका यांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र आणि भरत यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विटरच्या माध्यमातुन जीवेमारण्याची धमकी दिली आहे. सोशल मिडिया पेट्रोलिंग करतेवेळी हा प्रकार सायबर क्राइम पोलीसांच्या निदर्शनास आला. पोलीसांना माहिती मिळताच केवळ दोन तासांच्या आत हे ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्यात आले आणि ते कोणी ट्वीट केलंय याचा शोध घेतला.

LEAVE A REPLY

*