मुख्यमंत्र्याचा जिल्हा दौरा दुसर्‍यांदा रद्द

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जून महिन्यातीलच दुसरा नियोजित दौराही रद्द झाला आहे. जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा शुक्रवार 9 जूनच्या दौर्‍यापाठोपाठ असणारा आजचा 15 जूनचा नगर जिल्ह्याचा नियोजीत दौराही रद्द झाल्याचे प्रशासन सांगितले.
9 जूनचा रद्द झाल्याने प्रशासनाने पुन्हा 15 जूनच्या दौर्‍याची तयारी सुरु केली होती. आज जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त दारुबंदीसाठी ग्रामरक्षकदलाची स्थापना करुन मोहिमेला सुरवात करण्यात येणार होती. यासाठी 15 जूनची तारीख निश्‍चित करण्यात येवून तशी दोन महिन्यापासून तयारी करण्यात आली होती.मात्र, दौराच रद्द झाला.
9 जून रोजीच्या दौरा रद्दमुळे 15 जून रोजी मुख्यमंत्री जिल्ह्यात येवून जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे,कृषी पंपाना विज जोडणी देणे, स्वच्छ भारत ग्रामीण व नागरी योजना, प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा, पिक कर्ज पुर्नरगठणाचा आढावा व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आदीसह इतर कामांचा आढावा घेणार होते.
दरम्यान जिल्ह्यात सर्वात कमी काम असणार्‍या प्रत्येकी दोन बीडीओ, तालुका कृषी अधिकारी व मुख्याधिकारी यांचा विशेष समाचार घेण्यात येणार होता.याशिवाय विविध कामांची मुख्यमंत्री पाहणी करणार होते.
दौर्‍याच्या पार्श्‍वभुमिवर जिल्हाधिकारी यांनी महिनाभरापासून संबधित सर्व विभागातील विविध कामांचा आढावा घेवून पूर्वतयारी केली होती.त्यासाठी झेडपी, मनपा,नगरपंचायत, नगरपरिषद राज्य कृषी विभाग,बांधकाम,लघु पाटबंधारे,रोहयो,वनविभाग,पशुसंवर्धन, तहसिलदार, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, आदींसह इतर विभागांचे अधिकार्‍यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीची रंगीत तालीमच सुरु होती.

 

LEAVE A REPLY

*