मुख्यमंत्र्याचा आजचा जिल्हा दौरा रद्द

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा शुक्रवार 9 जून रोजी नगर जिल्ह्याचा नियोजीत दौरा रद्द झाला असल्याची माहिती मंत्रालयातून जिल्हा प्रशासनाला गुरुवारी दुपारीच मिळाली.
जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या मतदार संघातील कर्जतमध्ये मुख्यमंत्र्याच्या उपस्थित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्या पार्श्‍वभुमिवर जिल्हाधिकारी यांनी महिनाभरापासून संबधित सर्व विभागातील विविध कामांचा आढावा घेवून पूर्वतयारी केली होती.त्यासाठी झेडपी, मनपा,नगरपंचायत, नगरपरिषद राज्य कृषी विभाग,बांधकाम,लघु पाटबंधारे,रोहयो,वनविभाग,पशुसंवर्धन, तहसिलदार, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, आदींसह इतर विभागांचे अधिकार्‍यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीची रंगीत तालीम सुरु होती.
मात्र, मुख्यमंत्र्याचाच दौरा रद्द झाल्याची बातमी मिळाली.अन बैठकीच्या अनुषंगाने परिपूर्ण माहिती संकलित करणार्‍या अधिकार्‍यांचा चेहराच उतरला.तर,तयारी पूर्ण नसर्‍यासाठी दौरा रद्द झाल्याची वार्ता सुखद व महत्वपूर्ण ठरल्याची चर्चा आहे. दारुबंदीसाठी ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात येणार आहे. 15 जून रोजी राळेगणसिध्दी येथे मुख्यमंत्र्याच्या उपस्थित त्याचा प्रारंभ करण्याचे नियोजित आहे.त्याचवेळी आढावा बैठकही घेण्यात येण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविली जात आहे.
शेतकर्‍यांचा असंतोष तीव्र
संपाच्या माध्यमातून विविध प्रश्‍नांच्या मागण्यासाठी गेल्या आठ दिवसापासून संतप्त झालेल्या शेतकर्‍यांचा वाढता रोष लक्षात घेवून कायदा व सुव्यस्थेच्या दृनिे मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांचा आजचा नियोजित नगर जिल्हा दौरा रद्द करण्यात आला असल्याची जोरदार चर्चा बुधवारी सायंकाळ पर्यत प्रशासकीय वर्तृळात सुरु होती.
या विषयांचा घेणार होते आढावा
मुख्यमंत्री जिल्ह्यात येवून जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे,कृषी पंपाना विज जोडणी देणे, स्वच्छ भारत ग्रामीण व नागरी योजना, प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा, पिक कर्ज पुर्नरगठणाचा आढावा व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आदीसह इतर कामांचा आढावा घेणार होते.दरम्यान जिल्ह्यात सर्वात कमी काम असणार्‍या प्रत्येकी दोन बीडीओ, तालुका कृषी अधिकारी व मुख्याधिकारी यांचा विशेष समाचार घेण्यात येणार होता.याशिवाय विविध कामांची मुख्यमंत्री पाहणी करणार होते.

शेतकरी संघटना व विरोधी पक्षाचे नियोजन ङ्गेल
गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेल्या शेतकरी संपामुळे शेतकरी एकवटले. विविध ठिकाणी मोर्चे, आंदोलन, उपोषण, रास्तारोकोच्या माध्यमातून रास्तारोको करुन शेतकर्‍यांनी आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले. विशेष म्हणजे या लढ्याची सुरवातच जिल्ह्यातील पुणतांबा गावातून झाली.दरम्यान सात दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कोअर कमिटीची बैठक घेवून मध्यरात्री घेतलेले निर्णय अनेकांनी अमान्य करत संप पुढे सुरुच ठेवला. शेतकर्‍यांची होणारी एकी पाहून सेना, रा्रवादी-कॉगे्रसह विविध संघटना शेतकर्‍यांच्या पाठिंब्यासाठी रस्त्यावर उतरल्या.संपाची धग आणखी वाढली.पहिला टप्पा 7 जुन रोजी संपला.पुन्हा गुरुवारी नाशिक येथील बैठकीत शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी 12 रोजी रास्तारोको व 13 जुन रोजी रेल्वे रोको करण्याचा एल्गार पुकारल्याने सरकार आणखी धास्तावले आहे. त्ंयातच सर्व शेतकर्‍यांचा रोष ज्यांच्यावर आहे. ते मुख्यमंत्री स्वत:हा जिल्ह्यात येणार असल्याने शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नी जाब विचारण्यासाठी शेतकरी, विरोधी पक्षासह विविध संघटनांनी केलेले नियोजन दौरा रद्द झाल्याने ङ्गेल ठरले आहे.

LEAVE A REPLY

*