छिंदमचे बिर्‍हाड गावकुसाबाहेर ?

0

नगर टाइम्स,

पोलिसांनी बजावली नोटीस, आज संपली मुदत

अहमदनगर (प्रतिनिधी) – माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला जिल्ह्यातून तडीपार करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत. पोलिसांनी त्याला तशी नोटीस बजावत म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. ही मुदत आज संपत असल्याने पोलीस काय निर्णय घेतात याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक शब्द वापरल्याने श्रीपाद छिंदम प्रकाशझोतात आला. जेलची हवा खाल्ल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला. त्याचे उपमहापौर पदही गेले आहे. जामिनावर बाहेर असला तरी तो नगर शहरात नाही. त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल आहेत. त्याची जंत्री पोलिसांनी गोळा केली आहे. त्याआधारेच पोलिसांनी त्याच्या तडीपारीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयाने काढलेली नोटीस तोफखाना पोलिसामार्फत छिंदमला पोहचविण्यात आली. तडीपार का करण्यात येवू नये अशी विचारणा करणारी नोटीस दिल्यानंतर त्याला म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. 13 जूनपर्यंत त्याला म्हणणे मांडण्याची संधी दिली गेली असून ती मुदत आज संपुष्टात येत आहे. उद्यापासून पोलीस पुढची कायदेशीर कारवाई हाती घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. माजी नगरसेवक श्रीकांत छिंदमलाही तडीपार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तशी नोटीस काढण्यात आली, पण तिची बजावणी अजूनतरी झालेली नाही.

चार वर्षापूर्वीची तडीपारी रद्द
महापालिकेच्या 2013 च्या सार्वत्रिक निवडणुकीवेळेस श्रीपाद छिंदमवर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. त्याला नंतर राजकीय किनार मिळत त्यावेळी चर्चा रंगली होती. नंतर पुढे ही तडीपारी छिंदमने हायकोर्टातून रद्द करून आणली. आता परत त्याच्यावर ही कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

LEAVE A REPLY

*