शिवस्मारकाच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाकडून ‘ब्रेक’

0
सुमारे तीन हजार ६०० कोटी रुपये खर्चून छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात भव्य स्मारक उभारण्याच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम सर्वोच्च न्यायालयाने रोखले आहे. हे काम सुरू करण्यासाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ‘वर्क ऑर्डर’ काढली असली तरीही सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेश मिळेपर्यंत हे काम सुरू न करण्याचे तोंडी निर्देश दिले आहेत.
पर्यावरण संघटनांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. पर्यावरणवादी देबी गोयंकांच्या ‘कॉन्झर्व्हेशन अॅक्शन ट्रस्ट’ने सर्वोच्च न्यायालयात स्मारकाच्या कामाला अंतरिम स्थगितीच्या मागणीसाठी धाव घेतली आहे.
मुंबईतील गिरगाव चौपाटीजवळ असलेल्या १६.८६ हेक्टर आकाराच्या खडकावर हे शिवस्मारक उभारले जाणार आहे. चौपाटीपासून ही जागा ३.६ किमी अंतरावर, नरिमन पॉईंटपासून २.६ किमी अंतरावर, तर राजभवनपासून १.२ किमी अंतरावर आहे. या स्मारकाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पोहोचण्यासाठी नरिमन पॉईंट, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, नवी मुंबई, वर्सोवा या ठिकाणांहून बोटीच्या सुविधा उपलब्ध असणार आहेत.

LEAVE A REPLY

*