Photo Gallery / Video : छगन भुजबळांचे नाशकात आगमन; कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

0
नवीन नाशिक | राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे आज नाशकात आगमन झाले. सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी पाथर्डी फाटा येथे मोठी गर्दी केली होती. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत परिसर दणाणून निघाला होता.

छगन भुजबळ यांनी गाडीतून सर्व समर्थक कार्यकर्त्यांचे हात जोडून स्वागत स्विकारले. पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून पुढील कार्यक्रमाकडे भुजबळ निघाले.

याप्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील समता परिषदेचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

*