छगन भुजबळ यांचे इगतपुरीत स्वागत

0
इगतपुरी । माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचे तब्बल अडीच वर्षानतंर प्रथमच नाशिक जिल्हयाचे प्रवेशद्वार असलेल्या इगतपुरीत महात्मा फुले समता परीषद व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.

यावेळी छगन भुजबळ व पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांची कारागृहातुन सुटका झाल्यावर ते नाशिक जिल्हयात कधी येतील याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागून होती.

आज सकाळपासुनच इगतपुरी शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गवर स्वागताची तयारी करण्यात आली होती.आगमण होताच फटाक्याच्या आतषबाजी व ढोल ताशाच्या गजरात जोरदार जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी माजी जि. प. सदस्प गोरख बोडके, शहराध्यक्ष प्रल्हाद जाधव, माजी उपसभापती पांडुरंग वारूंगसे, प्रदेश सरचिटणीस संदीप गुळवे, सुनील वाजे, तानाजी आव्हाड, वसंत भोसले,  राष्ट्रवादीचे घोटी संपर्कप्रमुख किरण मुसळे, हितेश वाजे, माजी नगरसेवक यशवंत दळवी, समता परीषद तालुकाध्यक्ष शिवा काळे, हिरामण कवटे, किरण मुसळे, अक्षय दळवी, राजेंद्र घुगे, सिध्दार्थ भामरे, शरद वायदंडे, संदीप दगडे, मनोज दळवी, बाबू दोंदे, विलास जगताप, योगेश जाधव यांच्यासह महीला व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*