भुजबळांच्या आर्मस्ट्रॉंग कंपनीला नामको बँकेकडून जप्तीची नोटीस

0
सातपूर (प्रतिनिधी) ता. ११ : नाशिक औरंगाबाद रस्त्यावरील ओढा गावाजवळ असलेल्या छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांच्या मालकीची आर्मस्टाँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी असून कर्ज थकल्याने नाशिक मर्चंटस् बँकेने या कंपनीवर जप्तीची नोटीस बजावली आहे.

माजी मंत्री छगन भुजबळ यांचे सुपूत्र आ. पंकज भुजबळ आणि पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मालकीची ही कंपनी आहे. बँकेने दिलेल्या नोटीसीवर या दोघांची नावे आहेत.

या कंपनीकडे नामको बँकेचे कर्जापोटी सुमारे ४ कोटी ३४ लाखांची रक्कम थकीत असून त्यासंदर्भात बँकेने नोटीसही दिल्याचे बँकेच्या सूत्रांनी अधिकृतपणे सांगितले. दोन महिन्यांत परतफेड करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आल्याचे समजते.

 

LEAVE A REPLY

*