Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

येवल्यात छगन भुजबळांचा विजयी चौकार; शिवसेनेचा उमेदवार पराभूत

Share

येवला | प्रतिनिधी

येवला मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी त्यांचा विजयी घोडदौड सुरूच ठेवली असून यंदा विक्रमी मतांनी त्यांनी विजयी चौकार मारला आहे. भुजबळांच्या बाजूने जनतेचे कौल येऊ लागल्यानंतर भुजबळ समर्थकांनी येवल्यात एकाच जल्लोष केला. निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्यामुळे नाशिकमध्ये येऊन मतदान करू न शकणाऱ्या भुजबळ कुटुंबियांच्या डोळ्यांत आज आनंदाचे अश्रू यावेळी बघायला मिळाले.

भुजबळ यांच्यामागे इडीचे ग्रहण लागल्यामुळे जवळपास त्यांना अडीच वर्षे त्यांना कारागृहात राहावे लागले होते. याकाळात त्यांनी नियमित पत्रव्यवहार सुरु ठेवून जनतेचे प्रश्न कारागृहातून मार्गी लागण्याचा प्रयत्न केला होता.

मांजरपाड्याचे पाणी दोनशे किलोमीटरहून थेट येवल्यात पोहोचविल्यानंतर खऱ्या अर्थाने भुजबळांच्या बाजूने जनसमुदाय उभा राहिला होता. येवल्यातून कमीत कमी प्रचारात भुजबळांनी ५७ हजाराहून अधिक मतांनी विजय मिळवला.

आजच्या विजयाने छगन भुजबळ हा येवला लासलगावचा भूमिपुत्र आहे. हे जनतेने विरोधकांना स्पष्ट करून दिले असून केवळ जात पात सोयरे नको तर विकास पुत्र पाहिजे हे येवलेकरांनी दाखवून दिल्याची प्रतिक्रिया भुजबळांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!