पंजाबच्या ‘शान’ने मारली बाजी

पंजाबच्या ‘शान’ने मारली बाजी

सारंगखेडा ता. शहादा  – 

चेतक फेस्टिव्हल निमित्त झालेल्या चेतक पुरस्कारासाठी पंजाबचा दारासिंग यांचा शान या अश्वाची निवड करण्यात आली. देशाचा सर्वोत्कृष्ठ अश्वाचा मान त्यास मिळाला.

द्वितीय पुण्याचा खुदाब ख्श या अश्वांला देण्यात आला. सौदर्य स्पर्धत देशाचा अनेक भागातून शान सोबत गरुड, देवगुरु, रुस्तम, शिवा समशेर आदी महागडे अश्व येथे पाहण्याचा योग पर्यटकांना पाहायला मिळाले. चार दिवसापासून अश्व सौदर्य स्पर्धेचेे आयोजन करण्यात आले होते. त्यात शान च सर्वोत्कृष्ठ अश्व ठरला.

भारतातील सर्वोत्तम असलेला व देशाच्या कान्याकोपर्‍यापर्यंत पोहचलेला येथील अश्व बाजारात दरवर्षी अश्व स्पर्धा घेण्यात येतात. दि.19 पासून नुकरा, काठेवाड, मारवाड प्रजातीच्या अश्व सौंदर्यस्पर्धा घेण्यात येत आहेत.

यात गुजरात, राजस्थान, पंजाब, कर्नाटक, हरियाणा, तामीळनाडू,महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, केरळ या राज्यांतील अश्वांचा समावेश आहे. चेतक फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, सुखांजिंदर सिद्धू, अजित नंदाल, मनू शर्मा, जयेश पेखळे, प्रणवराज सिंह रावल उपस्थित होते.अश्व सौंदर्य पाहण्यासाठी अश्व शौकिनांची गर्दी झाली होती.

अश्व सौंदर्य स्पर्धेत देशभरातील घोडे आणि घोडींचा सहभाग होता. आज दि.22 रोजी मारवाड जातीच्या अश्व पाहण्यासारखे होते. स्पर्धत सहभागी झालेल्या एका अश्वाची किमत तब्बल एका कोटी पेक्षा अधिक होती.

यात 44 अश्वांच्या सहभाग होता. यात साठ कोटीहून अधिक किमंत होत होती. भारताचा चॅपीयन असलेल्या शानचा समावेश होता. चुरशीच्या या

स्पर्धेत सर्वोत्कृष्ठ पंजाबच्या दारासिंग यांचा शानला बहुमान मिळाला . द्वितिय पुण्याच्या रणजित खैर यांचा खुदाबक्श तर तृतीय अहमदनगरचे आ.अरुण जगताप यांचा अरबुस व नाशिकच्या अजीज यांचा काझीम यांना बहुमान देण्यात आला.

अजित नांदल, सुखजिंदर व जयेश पेखळे या अश्व तज्ज्ञांनी परीक्षक म्हणून काम पाहीले . त्यात नुकरा,काठेवाडे, मारवाड या प्रजातीच्या सौदर्य स्पर्धा झाल्या .

  असे करतात परिक्षण 

सौदर्य स्पधेत परिक्षण करतांना देखणा, रुबाब,अश्वांची उंची, डोळे ,कान याचे परिक्षण करतात, अश्वांचे वय, दात पाहून काही अंतर चालविला जातो. अवयव, डौलदार पणा पाहून सर्वोत्तम अश्व निवडला जातो

.आज 14 लाख 14 हजार 500 रूपयांच्या 32 घोड्यांची विक्री झाली.आज अखेर 3 कोटी 2 लाख 26 हजार 500 रूपयांचे 764 घोड्यांची विक्री झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com