चेन्नई : ‘जया टीव्ही’च्या ऑफिसवर आयकर विभागाचा छापा

0

चेन्नईमध्ये गुरुवारी सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जया टीव्हीच्या ऑफिसवर छापा मारला.

आयकर विभागाच्या दहा अधिकाऱ्यांनी गुरूवारी सकाळी सहा वाजता इक्कटथुथंग येथील जया टीव्हीच्या ऑफिसवर छापेमारी केली. तसंच आयकर विभागाने डॉक्टर नामधू एमजीआरच्या (तामिळ वृत्तपत्र) ऑफिसवरही छापेमारी केली आहे.

शशिकला यांच्या कुटुंबीयांशी संबंधीत काही जागा, समर्थक त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री जजललिता यांच्या कोदांद इस्टेटसह राज्यभरात 80 ठिकाणी छापेमारी सुरू आहे.

ही छापेमारी देशव्यापी असून एकुण 187 ठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी छापे मारत आहेत.

LEAVE A REPLY

*