डीएमके नेत्याकडून महिलेला लाथांनी मारहाण

0
चेन्नई : सत्तेची नशा आणि पैशाच्या धुंदीत असलेल्या नेत्यांच्या करामती तुम्ही बऱ्याचदा व्हिडीओच्या माध्यमातून पाहिल्या असतीलच. अशीच नशा असलेल्या एका नेत्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या नेत्याने चक्क एका महिलेला लाथांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.

तामिळनाडूमधील एम.के स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या डीएमके पक्षाचा हा नेता आहे. सेल्वाकुमार असे या नेत्याचे नाव असून तो डीएमकेचा माजी नगरसेवक होता. येथील पेरंबलुरमधील ब्युटी सलूनमध्ये सेल्काकुमार एका महिलेला लाथांनी मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. सीसीटीव्ही दिसणाऱ्या इतर महिला या राक्षसापुढे रडत-रडत गयावया करीत होत्या की तिला मारू नकोस तरीही तो थांबला नाही आणि त्याने मारहाण करणं थांबवलं नाही. सीसीटीव्ही बघितल्यानंतर सेल्वकुमारला अटक करण्यात आली असून त्याला पक्षातूनही काढून टाकण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*