‘घुमा’च्या प्रस्तुतकर्त्याविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दाखल

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – घुमा चित्रपटाचे निर्माते व प्रस्तुतकर्ता यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. प्रस्तुतकर्त्याने फसवणुक केल्याबाबतची फिर्याद निर्माता मदन संपतराव आढाव (वय- 33, धंदा- व्यापार, रा.राघवेंद्र स्वामी नगर, बोल्हेगाव,जि.अहमदगर) यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.
प्रस्तुतकर्ता डॉ. नितीन बबन दिघे (मुळ पारनेर जि. अहमदनगर, हल्ली राहणार अंबिका कॉम्लेक्स, घनसोली, नवी मुंबई) याने निर्मात्यांना काही निर्णय घेताना विचारात घेतले नाही. परस्पर निर्णय घेऊन मोठी नुकसान केली असून विश्वासघात व फसवणुक केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
फिर्यादीत म्हटलेे आहे की, मदन संपतराव आढाव, अदिनाथ महादेव धानगुडे, संतोष शिवाजी इंगळे, सारंग सदाशिव बारस्कर या चार निमार्त्यांनी मास फिल्म या नावाने चित्रपट निर्मीतीचा व्यवसाय सुरू केला. आम्ही चार निमार्त्यांनी व ड्रिम सेलर फिल्मसचे रावसाहेब मारूती काळे यांनी घुमा या मराठी चित्रपटाची निर्मिती केली.
या चित्रपटास शासनाचा प्रथम पदार्पण निर्माता पुरस्कार व पुणे फेस्टिवलमध्ये बेस्ट ऑडियन्स चॉईस पुरस्कार मिळाला आहे. प्रस्तुतकर्ता डॉ. दिघे याच्याशी घुमा चित्रपटाची निमिर्ती पुर्ण झाल्यावर चित्रपट प्रदर्शित करणे, जाहिराती करणे, प्रमोशन अ‍ॅक्टीव्हीटी करणेबाबत 50 लाखाचा करार करण्यात आला. 60 टक्के नफा प्रस्तुतकर्ता व 40 टक्के नफा निर्मात्यांचा असा करारात उल्लेख करण्यात आला.
डॉ. दिघे याने कराराचा भंग करत खर्च करण्यास असमर्थता दर्शविली व संबंधितांना दिलेले चेक बँक खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याने वटले नाहित. निमार्त्यांना डॉ. दिघेचे नाव प्रोमो, ट्रेलर व चित्रपटातून कमी करण्यासाठी सुमारे चार ते पाच लाख रूपये खर्च करावे लागले याबाबत 20 सप्टेंबर 2017 ला आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
तसेच प्रस्तुतकर्ता डॉ. दिघे याने फसवणूक करत निर्मात्यांना विश्‍वासात न घेता, स्वत:ची प्रसिद्धी व्हावी म्हणून घुमा चित्रपटाच्या नावाने नगर येथे 100 स्पर्धकांची डान्स स्पर्धा आयोजित करत प्रत्येकी 300 ते 400 रुपये घेऊन स्वतःचा फायदा केला व काही वृत्तवाहिन्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून स्वतःची प्रसिद्धी करून घेतली.

 

LEAVE A REPLY

*