स्वस्त धान्य दुकानदारांचा राहुरीत मोर्चा

0
राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी शहरातील एमपी सेवा संस्थेच्या धान्य दुकान चालकावरील विनयभंगाचा खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा, म्हणून धान्य दुकानदार संघटनेकडून राहुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. संघटनेकडून पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देण्यात आले.
येथील तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चातही धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, सचिव रज्जाकभाई पठाण, तालुका संघटनेचे अध्यक्ष जालिंदर ढोकणे आदींसह दुकानदार उपस्थित होते. एम. पी. सोसायटीचे सरकारमान्य रास्तभाव दुकान असून येथे सावळेराम सोडनर दुकानचालक असल्याचे सांगीतले. शासनाने चालू महिन्यापासून पॉज मशीनवर धान्य विक्री करण्याचा आदेश काढलेला आहे.
तसेच शासनाने केसरी शिधापत्रिकांवर धान्य देण्याचे बंद केले आहे. यामुळे पॉज मशीन तपासणी केली असता केसरी कार्डधारकांना धान्य देता येत नाही. यामुळे राहुरी शहरातील एका महिलेने केसरी कार्ड दाखवीत सोडनर यांना धान्याची मागणी केली. सोडनर यांनी पॉज मशीनवर केसरी कार्ड धारकांना धान्य देता येत नसल्याने धान्य देण्यास नकार दिला. धान्य न दिल्याचा राग आल्यानेच महिलेने पोलीस ठाणे गाठत विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे पोलीस व महसूल प्रशासनाला सांगीतले.
निवेदनात सुनील पानसरे, शिवाजी गाडे, नवनाथ मंडलीक, रावसाहेब गाडे, देवराम वाघमोडे, सुरेश कोकाटे, बाळासाहेब जाधव, शरीफ पठाण, सोपान गाडे, रमेश पवार, सोमनाथ पागिरे, उत्तम तमनर, उत्तम उगले, संदीप गाडे, रमेश निसळ, शरद वाळके, रशीद शेख, विलास कदम, लक्ष्मण गोसावी, सचिन आढाव, बाबा चोथे, रघुनाथ शेलार, बापू तागड, संजय तरवडे, गंगाधर हारदे, आदींच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

*