स्वस्त धान्य व रॉकेल दुकानदारांचा संप सुरू

0

संगमनेर/नेवासा (प्रतिनिधी) – मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित मागण्या शासनाने मान्य न केल्याने सरकारमान्य स्वस्त धान्य व किरकोळ रॉकेल दुकानदार संघटनेच्यावतीने 1 ऑगस्ट 2017 पासून स्वस्तधान्य व रॉकेल दुकानांचा बेमुदत बंद सुरू केला आहे.

संगमनेर तहसीलदारांना संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने यापूर्वी अनेकवेळा स्वस्त धान्य दुकानदारांच्या अडचणी संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे. परंतु त्यांची शासनाने कोणतीच दखल घेतली नाही. एकही मागणी अद्याप पर्यंत मान्य केलेली नसून फक्त आश्‍वासन मिळालेले आहे.

पुढे कोणतीही कारवाई झालेली नसल्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्व स्वस्त धान्य दुकानदार व रॉकेल दुकानदार मालाची उचल व विक्री करणार नाहीत. गोरगरीब जनतेला वेठीस धरण्याचा संघटनेचा उद्देश नसून दुकानदारांच्या रास्त मागण्या शासन दरबारी पोहचविणे व त्या मागण्या मान्य करुन घेणे हा उद्देश आहे असे निवेदनात नमूद करण्यात आल्याची माहिती संगमनेर तालुका संघटनेचे अध्यक्ष संजय फटांगरे यांनी दिली.

निवेदनावर पुष्पा डावखरे, वैशाली सांगळे, रामनाथ वाळे, नितीन गोरे, संगिता राहतेकर, केशव डुबे, संजय देशमुख, अरगडे, लक्ष्मण वाळे, सुकदेव खताळ, दिवे, आव्हाड, राजू भडांगे, वालझाडे, नाना थोरात, प्रभाकर कर्डीले, नंदु भडांगरे, ज्ञानेश्‍वर नाईक, मणियार, आर्या आदींच्या सह्या आहेत.

नेवासा तालुक्यातील स्वस्त धान्य व रॉकेल दुकानदारांनी काल 1 ऑगस्टपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून याबाबत काल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मुनीर देशमुख, जिजाबाई शेजूळ, भारत गवळी, आर. व्ही. मते, एल. बी. गव्हाणे, एम. एस. गुडधे आदींसह तालुक्यातील सर्व धान्य व रॉकेल दुकानदार उपस्थित होते.

 

या आहेत संघटनेच्या मागण्या – स्वस्त धान्य व रॉकेल दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करावी, दुकानदारांना माल वजन करून व थप्पी मारून मिळावा, आधार फिडिंगचे काम 100 टक्के पूर्ण झाल्या नंतरच पीओएस (पॉज) मशीनची सक्ती करण्यात यावी, तामिळनाडू व झारखंड राज्यांप्रमाणे अन्न महामंडळाची स्थापना करून दुकानदारांना सामावून घेण्यात यावे, शासकीय नियमानुसार वेतन देण्यात यावे, केसरी कार्डधारकांना एपीएल दरा प्रमाणे माल उपलब्ध करून द्यावा, दुकानदारास मदतनीस ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, वधवा कमिटीच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, गॅस वितरणाचा परवाना देण्यात यावा.

LEAVE A REPLY

*