स्वस्त धान्य दुकानकार संपावर

0

 

राजुरी (वार्ताहर)- शासनाकडे वेळोवेळी मागण्या करूनही स्वस्त धान्य दुकानदाराच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे राहता तालुक्यातील स्वस्त धान्य व केरोसीन विक्रेत्यानी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदन विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने स्वस्त धान्य व केरोसीन विक्रेत्यांच्या मागण्या शासनाकडे निवेदनाद्वारे केल्या असून तरी शासनाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही. शासनाने शेतकर्‍यांइतका अंत न पाहता स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या मान्य कराव्या नाहीतर 1 ऑगस्टपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, जिल्हा सचिव रज्जाक पठाण, राहाता तालुका अध्यक्ष ज्ञानदेव वहाडणे,
उपाध्यक्ष गणेश येलम, दत्तात्रय अभंग, एम.एम. जेजुरकर, श्रीकांत म्हस्के, बाळासाहेब कडलग, चांगदेव गाडेकर, नानाभाऊ गाडगे, रघुनाथ गाडेकर, चांगदेव पवार, देविदास म्हस्के, के.बी. गागरे, वैभव शिंदे, राजेंद्र नरोडे, राहुल जोगदंड, कृष्णा चेचरे, दत्तू हारदे,
मोहन राठोड, योगेश धनवटे, रमेश अंभोरे, सतीश महाले, प्रताप पानसरे, संपत घोलप, गायकवाड, किशोर वराडे, प्रकाश राहिंज, ए.ए. कडलग, बी.डी.काळे, शिवराम धोक्रट, एस.एस. चांडक, राजेंद्र गांधी आदींसह स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेत्यांच्या सह्या आहेत. तरी शासनाने या मागण्यांचा विचार करून स्वस्त धान्य दुकानदारांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करण्यात आली.

स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्यांचा शासन दरबारी विचार करून स्वस्त धान्य दुकानदारांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे आश्‍वासन महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातून व तालुक्यातून आलेल्या स्वस्त धान्य दुकानदारांना दिले.

LEAVE A REPLY

*