स्वस्त धान्य दुकानदार संपाच्या निर्णयावर ठाम

0

बैठकीत तोडगा निघाला नाही राज्यातील 55 हजार दुकानदार जाणार संपावर? 

श्रीरामपूर (प्रतिनीधी)- वितरण व्यवस्थेतील त्रूटी आणि दुकानदारांच्या विविध प्रश्नासंदर्भात राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट, प्रधान सचिव महेश पाठक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दुकानदारांच्या प्रश्नाबाबत कुठलाही ठोस निर्णय न झाल्याने रेशन दुकानदार 1 ऑगस्ट पासून संपावर जाण्याच्या निर्णयावर ठाम असल्याची माहीती संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांसह राज्यातील 55 हजार दुकानदारांनी आपल्या विविध मागण्या संदर्भात 1 ऑगस्ट पासून संपावर जाण्याचा निर्णय जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत घेतला होता. त्या संपाबाबत योग्य तो तोडगा काढण्याकरीता अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट प्रधान सचिव महेश पाठक यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख व पदाधिकार्याचीं बैठक मंत्रालय, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र फेअरप्राईज शॉप किपर्स फेडरेशनचे अध्यक्ष मा. खासदार गजानन बाबर विजय गुप्ता निवृत्ती कापसे भवाना डोळसे देविदास देसाई मिनाताई कळकुंभे, रज्जाक पठाण, पोपट दराडे, चंद्रकांत यादव यांनी संघटनेच्या मागण्या मांडल्या.

दुकानदारांना तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर अन्न महामंडळ स्थापन करुन दुकानदारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, संगणकीकरणाची कामे अनेक ठिकाणी अपूर्ण असल्यामुळे शंभर टक्के आधार फिडींग झाल्यावरच मशिनचा वापर करण्यात यावा, रॉकेल विक्रेत्यांना गॅस एजन्सी देण्यात यावी, द्वार पोहोच योजना सुरू असताना हमाल, ठेकेदार दुकानदारा कडून सक्तीने वसूली करतात ती थांबविण्यात यावी, वेगवेगळ्या योजनांची थकीत बिले त्वरीत अदा करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. यावर पुरवठा मंत्री गिरीश बापट म्हणाले की, शासनाच्या या चागंल्या योजनेचा दुकानदार हा महत्वाचा घटक मानून पूरवठा विभागाने त्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहे.

पॉज मशिनच्या माध्यमातून धान्य वाटप करण्याचा धाडसी अन चांगला निर्णय घेतला हे करत असताना दुकानदारांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला. पुढील काळात दुकानदारांना त्याच्यां दुकानात माल थप्पी मारुन दिला जाईल, दुकानदारांना चलनाव्यतीरिक्त ईतर पैसे देण्याची गरज नाही. त्यामुळे त्याच्या खर्चात बचत होईल. आधार संकलन करण्याकरिता दुकानदारांना प्रति कार्ड पाच रूपये या प्रमाणे अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पैसे देण्यात आलेले आहे. लवकरच शंभर टक्के काम केलेचा मोबदला देण्यात येईल.

रॉकेल विक्रीसाठी फ्रि सेल योजना सुरु करण्यात आली आहे, वाहतूक रिबेट मध्ये सुधारणा करण्यात आली असून ऑगस्ट पासून ते दर लागू केले जातील दुकानदारांच्या मार्जिन बाबतही सरकार सकारात्मक असून कॅबिनेट बैठकीत मंजुरी घेतल्यानंतर जितके क्विंटल धान्य मशिनद्वारे वितरीत होईल तितकेच मार्जिन दिले जाईल, तेव्हा दुकानदारांनी संपावर जाण्याचा निर्णय सोडून शभंर टक्के धान्य मशिनद्वारे च वाटप करावे, असे अवाहन केले. मात्र त्यांच्या निर्णयावर दुकानदारांचे समाधान झाले नाही. त्यामुळे 1 ऑगस्ट पासून सांपावर जाण्याचा निर्णय त्यानंतर घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला.

LEAVE A REPLY

*