स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्यांसंदर्भात योग्य निर्णय घेऊ – मुख्यमंत्री शिंदे

jalgaon-digital
2 Min Read

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्यांसंदर्भात विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स फेडरेशनच्या शिष्टमंडळाला दिले.

स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, फोर जी मशिन तातडीने देण्यात यावे, एनआयसीच्या कामकाजात सुधारणा करण्यात यावी यासह इतर मागण्यांसंदर्भात ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

महाराष्ट्रात एकूण 55 हजार स्वस्त धान्य दुकाने असून दुकानदारांना कमी प्रमाणात कमिशन मिळत असल्यामुळे दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, अनेकदा नेट अभावी दुकाने बंद ठेवण्याची वेळ येते, त्यामुळे कार्डधारकांची गैरसोय होते म्हणून दुकानदारांना फोर जी मशिन देण्यात यावे, पॉज मशिनला सुविधा पुरविणा़र्‍या एनआयसीच्या कामकाजात सुधारणा व्हावी, त्या त्या महिन्याचे धान्य त्याच महिन्याला मिळावे, मोफत धान्य वाटपाचे कमिशन तातडीने वर्ग करण्यात यावे, आवश्यक त्या ठिकाणी केरोसीन वितरण सुरू करण्यात यावे, आयएसओ मानांकनाची सक्ती करण्यात येऊ नये, अशा मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री शिंदे यांना देण्यात आले.

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ, इगतपुरीचे आ. हिरामण खोसकर, आ. सरोज अहिरे, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे, जनरल सेक्रेटरी बाबुराव ममाणे, नागपूर विभागीय अध्यक्ष संजय पाटील, नांदेंड जिल्हाध्यक्ष अशोक एडके, नागपूर शहराध्यक्ष सुभाष मुसळे, वर्धा जिल्हाध्यक्ष संजय देशमुख, हिंगोली जिल्हाध्यक्ष भिकुबाई मोहिते, नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे, शाहु गायकवाड, धर्मराज चौधरी, अरुण बागडे, इगतपुरी गोपी मोरे, दिंडोरी सुदाम पवार, देविदास पगारे, दशरथ मेधने, कैलास मोखनळ, राहुल गायकवाड, अमोल धात्रक, केशव भुसारे, नितीन शार्दुल, प्रकाश पगार, रवी माळगावे, भास्कर पताडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *