Type to search

Featured सार्वमत

रद्द ठरविलेल्या पारनेर तालुक्यातील चार छावण्यांना मंजुरी

Share

तहसीलदारांच्या पाठपुराव्यामुळे छावण्यांना मान्यता; तांत्रिक कारणांमुळे केल्या होत्या रद्द

पारनेर (तालुका प्रतिनिधी)– पारनेर तालुक्यांमध्ये जनावरांच्या चारा छावण्या सुरू झाल्या असून अद्यापपर्यंत तालुक्यामध्ये जिल्हाधिकार्‍यांनी एकोणीस छावण्यांना मंजुरी दिली होती. त्यातील पाच छावण्या जिल्हाधिकार्‍यांनी सुरू नसल्याचे कारण देत परवानग्या रद्द केल्या होत्या परंतु त्या छावण्या सुरू असून तांत्रिक कारणामुळे त्या जिल्हाधिकार्‍यांनी रद्द ठरवल्या होत्या त्यातील चार छावण्यांना पुन्हा मंजुरी मिळाली असल्याची माहिती पारनेर तहसील कार्यालया मार्फत देण्यात आली आहे. सध्या पारनेर तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून जनावरांच्या चार्‍याचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. छावण्यांची संख्या सध्या अद्यापपर्यंत 18 एवढी असून त्यापैकी एक छावणी अद्याप सुरू झालेली नाही तर तालुक्यातील इतर गावांतील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पेंडिंग आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ते प्रस्ताव मार्गी लागतील अशी माहिती कार्यालयामार्फत देण्यात आली.

दरम्यान तालुक्यातील पाच चारा छावण्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने दि .14 रोजी रद्द केले होते परंतु या छावण्या सुरू झालेल्या होत्या व त्यातील चार छावण्यांनी जनावरांचे निकष देखिल पूर्ण केले होते पण त्याच रद्द ठरवल्यानंतर त्या छावणी चालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते त्याच प्रमाणे शेतकर्‍यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला होता परंतु तहसील कार्यालयामार्फत पुन्हा या छावण्या सुरू करण्याबाबत प्रस्ताव सादर करून अखेर दिनांक 16 रोजी यातील श्रीदत्त बहुउद्देशीय संस्था जामगाव ,संगमेश्वर मजूर सहकारी संस्था पारनेर, शहीद अरुण बबनराव कुटे स्मृती प्रतिष्ठान वडनेर हवेली, राजे वारियर्स प्रतिष्ठान कडूस,या चार छावण्या पुन्हा सुरू करणेबाबत मंजुरीचे पत्र जिल्हाधिकारी यांनी दिले आहे यातील राजमाता महिला सहकारी पतसंस्था पानोली यांची जनावरांची संख्या कमी होती. त्यांनी दि. 16 रोजी ती पूर्ण केली असून ती छावणी देखील दोन दिवसांमध्ये सुरू होणार असल्याची माहिती तहसील कार्यालयामार्फत देण्यात आली आहे
सध्या तालुक्यामध्ये एकूण 17 छावण्या सुरू आहेत त्यामध्ये 1179 लहान जनावरे व 7595 मोठे जनावरे असून एकूण जनावरांची संख्या 8774 आहे तालुक्यामध्ये एकूण 18 गावांमध्ये सध्या छावण्या जिल्हाधिकार्‍यांनी मंजूर केल्या असून इतर उर्वरित गावांमध्ये देखील येत्या काही दिवसांमध्ये जनावरांच्या छावण्या मंजूर होतील.

बंद झालेल्या छावण्यांसंदर्भात 15 रोजी पारनेर तहसील कार्यालयाने जिल्हाधिकार्‍यांना पुन्हा पाठपुरावा केला. पारनेर तहसील कार्यालयाच्या म्हणण्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित पाच छावण्या सुरू कण्याबाबतचे पत्र हे 8 मार्चला पारनेर तहसील कार्यालयात प्राप्त झाले होते; परंतु जिल्हाधिकारी कार्यालयानुसार या पत्रावर 5 मार्च असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे या तांत्रिक कारणामुळे छावण्या रद्द ठरवण्यात आल्या होत्या. परंतु त्यातील जनावरांची संख्या पूर्ण असून छावण्या सुरू होत्या. त्यामुळे त्यांची पुन्हा मंजुरी काढण्यात आली असल्याची माहिती पारनेर तहसील कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!