संगमनेरात छात्रभारतीचे आंदोलन

0
संगमनेर (तालुका प्रतिनिधी) –12 वी पर्यंन्तचे शिक्षण अनुदानित करावे या मागणीसाठी छात्र भारती संघटनेच्यावतीने आज आंदोलन करण्यात आले. संगमनेर महाविद्यालय पासून निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष अनिकेत घुले यांनी केले .

12 वी पर्यंतचे शिक्षण हे मूलभूत असून ते सर्वाना सामान मोफत व गुणवत्तापूर्वक मिळाले पाहिजे त्यासाठी ते अनुदानित असणे गरजेचे आहे. एकाच शाळेत शिकणार्‍या दोन विद्यार्थ्यांना वेगवेगळे शुल्क आकारले जाते. कितीतरी विद्यार्थ्यांना गुणवत्ता असून देखील केवळ पैशाअभावी शिक्षण अर्धवट सोडावे लागते. बसच्या पाससाठी पैसे नसल्यामुळे विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना अजून ताजीच आहे.

त्यामुळे ही भेदभावावर आधारीत व्यवस्था बंद करुन 12 वी पर्यंतचे शिक्षण अनुदानित असावे, 12 वी पर्यंतच्या अनुदानाच्या मुद्द्यासाठी विना अनुदानित तत्वावर शिकविणार्‍या शिक्षकांचे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे प्रामुख्याने 11 वी 12 वी मध्ये शिकविणार्‍या विद्यार्थांचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे.

तरी शासनाने मान्यता दिलेल्या 12 वी पर्यंतच्या सर्व वर्गांना इतर कुठल्याही अटी शर्ती न लावता त्वरीत 100 टक्के अनुदान द्यावे अशी मागणी छात्रभारती संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. रजत अवसक, शिवराज शिंदे, शुभम गोडसे, स्वप्नील मानव, वासिद शेख, स्वप्नील रणखांबे आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयातील चंद्रकांत जाधव यांनी स्विकारले.

LEAVE A REPLY

*