Friday, May 3, 2024
Homeनगरकारची टेम्पोला धडक; दोघांचा मृत्यू

कारची टेम्पोला धडक; दोघांचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी)| Ahmednagar

अहमदनगर-पुणे महामार्गावरील चास-कामरगाव घाटात (ता. नगर) झालेल्या भीषण अपघातात अहमदनगर शहरातील दोघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

- Advertisement -

अहमदनगरमधील प्रसिध्द मूर्तीकार बबन ऊर्फ लक्ष्मण दत्तात्रय गोसके (वय 62 रा. बागरोजा हडको) व महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश रंगनाथ गोरे यांचा मृत्यू झाला तर महापालिकेतील वाहन चालक प्रशांत प्रकाश पवार हे जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी नोंद केली आहे.

पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील भैरवनाथ यात्रेवरून अहमदनगरकडे परतत असताना चास- कामरगाव घाटात समोर चाललेल्या टेम्पोला कारची पाठीमागून जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. कारमधील दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या