Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकसलग दुसर्‍या वर्षी रथोत्सव रद्द

सलग दुसर्‍या वर्षी रथोत्सव रद्द

पंचवटी। वार्ताहर

नाशिकचा सर्वात मोठा पारंपरिक रथोत्सवात म्हणून श्रीरामरथ व गरुडरथाची मिरवणूक काढण्यात येते. परंपरेनुसार या दोन रथांपैकी श्रीरामरथ हा नदीपात्र ओलांडून नेत नाही, तर गरुडरथ हा नदीपात्र ओलांडून शहर परिसरातून पुन्हा गोदाघाटावरून रामकुंडाकडे आणण्यात येतो. करोनामुळे सलग दोन वर्ष रथोत्सव रद्द करण्याची वेळ आली असताना श्रीरामरथाची डागडुजी, रंगरंगोटी चांगल्या रितीने करण्यात येत असताना गरुड रथाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या रथाला अवकळा आली आहे.

- Advertisement -

श्रीरामरथाची व्यवस्था रास्ते आखाड्याकडे आहे. हा रथ ओढण्याचा मान रास्ते आखाडा तालिम संघ व पाथरवट समाजाकडे आहे तर गरुड रथाची व्यवस्था ही श्रीकाळाराम संस्थानकडे आहे. हा रथ ओढण्याचे काम अहिल्याराम व्यायामशाळेकडे आहे. श्रीरामरथ हा वर्षभर थांबविण्याची व्यवस्था पुरीया रोडवरील खांदवे सभागृहाच्याजवळ करण्यात आलेली आहे.

गरुडरथाची व्यवस्था ही काळाराम मंदिराच्या पूर्वदरवाजाच्या उत्तरेला करण्यात आलेली होती. मात्र, गेली दोन वर्षांपासून रथाला निवार्‍याची जागा नसल्यामुळे हा रथ कित्येक महिने पूर्वदरवाजाच्या शेजारी उभा केला होता. उन्हानंतर पाऊसही या रथाने झेलला. त्यानंतर त्यावर प्लास्टिकचा पेपर टाकून झाकण्याचा प्रयत्न झाला.

पूर्वदरवाजाच्या भागात सुशोभिकरण्याचे काम सुरु झाल्यानंतर हा रथ काळाराम मंदिराच्या पार्किंगच्या जागेत हलविण्यात आला. तेथे हा रथ पडून आहे. त्याच्यावर टाकण्यात आलेले प्लास्टिक फाटून त्यांचे तुकडे झालेले आहे. रथांचा रंग उडाला आहे. कित्येक दिवसांपासून पडून असल्याने त्यावरील लोखंडी साधने गंजून गेली आहेत. खाली गवत वाढलेले आहे. लाकूड कुजून गेलेले आहे. अशा या बिकट स्थितीत सध्या हा रथ पडून आहे.

काळाराम मंदिरातील वासंतिक नवरात्रोत्सवात चैत्र शुध्द एकादशीला हा रथ सर्वात पुढे असतो. त्याच्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. रथोत्सव होणार नसला तरी किमान रथाची पूजेसाठी तरी रथाकडे लक्ष देणे गरजेचे असताना तसे केलेले दिसत नाही. काळाराम मंदिरात शुक्रवारी (दि. 23) रोजी रथोत्सवाच्या निमित्ताने पूजा व मंदिराच्या आवारातच पालखी मिरवण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या