कन्हैया कुमारसह ९ जणांविरोधात देशद्रोहाचा खटला चालणार

0
नवी दिल्ली : ९फेब्रुवारी २०१६ला जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या आक्षेपार्ह घोषणाबाजीचा तब्बल तीन वर्षं तपास केल्यानंतर आज दिल्ली पोलीस पतियाळा हाऊस कोर्टात आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. या आरोपपत्रात कन्हैया कुमार, अनिर्बान भट्टाचार्य,उमर खालिद यांच्याशिवाय सात काश्मीरी नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे.

जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारसह ९ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. आज (ता. १४) या प्रकरणी स्पेशल सेल पतियाळा कोर्टात आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. कन्हैया कुमारसह उमर खालीद, अर्निबान भट्टाचार्य यांचाही आरोपपत्रात समावेश आहे. त्याचबरोबर काश्मीरी विद्यार्थ्यांचा आरोपत्रात समावेश आहे.

यामध्ये अकीब हुसेन, मुजीब हुसेन, मुनीब हुसेन, उमर गुल, रयिस रसूल, बशरत अली आणि खालीद भट अशी त्यांची नावे आहेत. या विद्यार्थी नेत्यांविरोधात राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात तब्बल तीन वर्षं तपास सुरू होता. आता तपास पूर्ण झाला असून लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*