चन्या बेगप्रकरणी सानपला अटक

0

नगरसेविकेचा पती आणि बाजार समितीच्या संचालकासह पाच जणांची कसून चौकशी

 

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- चन्या बेग प्रकरणी नगरसेविका पती, बाजार समितीचे संचालक यांच्यासह पाच ते सहा जण पोलिसांच्या चौकशीच्या फेर्‍यात अडकले आहेत. तसेच निखिल सानप व प्रदीप सानप या दोघांना पोलिसांनी काल सकाळी अटक केली आहे. चन्या बेग प्रकरणाशी जे-जे लोक संबंधित आहेत. अशा लोकांची धरपकड करण्यास पोलिसांनी सुरुवात केल्याने श्रीरामपुरातील अनेक दिगज्जांचे धाबे दणाणले आहेत.

 

विविध गुन्ह्यात अडकलेला कुख्यात गुंड चन्या उर्फ सागर बेग त्याचा भाऊ टिप्या उर्फ आकाश बेग व सागर रावसाहेब शिंदे, सागर शेटे या चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यांना अटक केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, जीवंत काडतुसे, कार, मोबाईल असा आठ लाख 37 हजारांचा ऐवज ताब्यात घेतला. त्यांच्याबरोबर असलेले अर्जुन दाभाडे, लखन माखिजा, रितेश काटे, सुधीर काळोखे हे आरोपी पसार झाले आहेत.

 

 

या प्रकरणाशी संबंधित असलेल्या प्रदीप सानप व निखिल सानप या दोघांना अटक केली आहे. तसेच श्रीरामपूर पालिकेच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका अक्सा पटेल यांचे पती अल्तमश पटेल, श्रीरामपूर बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब थेटे यांच्यासह पाच ते सहा जण चौकशीच्या फेर्‍यात अडकले असून पोलिसांनी काल त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चन्या बेग व त्याच्या साथीदारांना अटक केल्यानंतर पोलिसांनी या टोळीशी संबंधित असलेल्या श्रीरामपुरातील काही लोकांची गुप्त चौकशी सुरू केली होती. या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांना पोलीस ताब्यात घेत असल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले असून काहींनी तर दिवाळी सणाच्या काळात श्रीरामपूर सोडले.

 

 

काल अटक करण्यात आलेल्या निखिल सानप, प्रदीप सानप यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी यातील पसार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यात सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

*