Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

संगमनेर येथील क्रीडांगणाच्या आरक्षणात बदल

Share

मुंबई – अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील क्रीडांगणाच्या आरक्षति जागेपैकी काही क्षेत्र वगळून त्यास प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान या उपयोगासाठी आरक्षीत करण्यास आज झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. संगमनेर शहराच्या संगमनेर (बु.) येथील सर्व्हे क्रमांक 153 व 154 या आरक्षण क्रमांक 76 वर क्रीडांगणाचे आरक्षण आहे.

यापैकी सर्व्हे क्रमांक 153 मधील 4250 चौरस मीटर क्षेत्र क्रीडांगण आरक्षणातून वगळून प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान या वापरासाठी आरक्षित करण्याचा ठराव नगरपरिषदेने 10 ऑक्टोबर 2017 रोजी केला.

त्यानुसार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम-1966 अन्वये सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करुन हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाला सादर करण्यात आला होता. त्यास मंत्रिपरिषदेने आज मंजुरी दिली. या वापर बदलामुळे प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान या सार्वजनिक वापरासाठी ही जागा उपलब्ध होणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!