सरकार बदलण्याची वेळ आली आहे – मनमोहन सिंग

0
नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज ‘भारत बंद’ पुकारला आहे. दिल्लीमधील रामलीला मैदानावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासहित विरोधी पक्षनेते एकवटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारदेखील उपस्थित आहेत. यावेळी बोलताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आता सरकार बदलण्याची वेळ आली असल्याचं म्हटलं आहे.

मोदी सरकराने देशाचं हित नसणाऱ्या अनेक गोष्टी केल्या आहेत. सरकार बदलण्याची वेळ आली आहे असं मनमोहन सिंग बोलले आहेत. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेसने दिलेल्‍या भारत बंदला २१ राजकीय पाठिंबा दिला आहे. मात्र, शिवसेनेनं या बंदला पाठिंबा दिलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे सतत वाढणाऱ्या दराने आता उच्चांक गाठला आहे.

हे आंदोलन नागरिकांना दिलासा देण्यासाठी आहे. त्यामुळे या आंदोलनात जनतेचे, व्यापाऱ्यांचे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता काँग्रेस कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*