चांदवडला महामार्ग रोखल्यानंतर शेतकऱ्यांचे वारीतील रिंगण करून भजन

0

मुख्यमंत्र्याच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर पुणतांब्यातील काही शेतकर्‍यांनी संप मागे घेतल्याचे जाहीर केले असले तरी काही दिवसांच्या संभ्रमानंतर नाशिककर आपल्या संपावर ठाम राहिले.

यात आज सोमवारी महाराष्ट्र बंद ठेवणार असल्याची हाक शेतकरी आंदोलकांनी दिली होती. यामूळे चांदवड तालुक्यात आज कडकडीत बंद ठेवण्यात आला.

या पार्श्‍वभुमिवर आज चांदवड तालुक्यातील संतप्त शेतकर्‍यांनी येथील मुंबई-आग्रा महामार्ग गाठत रास्ता रोको केला. दरम्यान यावेळी पोलिसांनी रास्ता रोको करण्यास आपला विरोध दर्शविला असता आम्ही कुठल्याही प्रकारचे हिंसक आंदोलन करत नसल्याचे शेतकर्‍यांनी पोलीस अधिकार्‍यांना सांगितले.

संपूर्ण राज्यभर संपात शेतकर्‍यांनी टोकाचे पावले उचलत जाळपोळ, शेतमालाची नासाडी करत आपल्या संतापाला मोकळी वाट करून दिली. चांदवडच्या शेतकर्‍यांनी मात्र, असे कुठलेही पाऊल न उचलता महामार्गावर विठू नामाचा गजर करत गोल रिंगण घालत आंदोलन केले. या रिंगण आंदोलनात कुठल्याही व्यवस्थेविरोधात घोषणा न देता फक्त शेतकर्‍यांचे प्रश्‍न मांडण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी टाळ, मृदूंगाच्या निनादात विठूनामाचा गजर केला.

सुमारे अर्धा तासात संपलेल्या या रास्ता आंदोलनानंतर येथील बाजारतळात सभेने आंदोलनाची सांगता झाली. यावेळी चांदवड पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान विठू नामाचा गजर करत झालेल्या या अनोख्या आंदोलनाने राज्यभराचे लक्ष वेधले गेले असून इथल्या शेतकर्‍यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा संदेश दिला.

LEAVE A REPLY

*