Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

चांदवड खून प्रकरण : स्थागुशाने गोव्यात सिनेस्टाईल पाठलाग करत केले संशयितास जेरबंद

Share

नाशिक | प्रतिनिधी

चांदवड बस स्थानक परिसरात भरदिवसा खुन करणाऱ्या संशयितास गोवा राज्यातून स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. एप्रिल महिन्यात चांदवड बस स्थानक परिसरात एका 25 वर्षीय युवकाचा खुन झाला होता. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल्र करण्यात आला होता.

अधिक माहिती अशी की, १७ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास चांदवड शहरातील रहिवासी इम्रान फारूख शेख यांचा मुलगा सद्दाम शेख, वय 25 यास त्याचा मित्र प्रेम निवृत्ती पवार, रा. आडगाव टप्पा, ता.चांदवड याने अज्ञात कारणावरून झालेल्या वादावरून तिक्ष्ण  हत्याराने सद्दाम याच्या छातीवर व पोटावर वार करून गंभीर जखमी करत जिवे ठार मारले होते.

भरदिवसा घडलेल्या प्रकारामुळे गुन्हेगारी मोडीत काढण्याची मागणी होत होती. घटनेनंतर गुन्हयातील संशयित प्रेम पवार फरार होता. नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह व मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक श्रीनिलोत्पल यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हयाचा तपास सुरु केला होता.

गुन्हयातील संशयित एक महिन्यापासून अज्ञात स्थळी होता. दरम्यान, संशयिताच्या नातेवाईक, मित्रांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली. त्यानंतर संशयित गोव्यात असल्याचे समजले.

त्यानंतर एक पथक गोव्यात संशयिताच्या शोधार्थ निघाले. संशयित गोव्यातील आरपोरा भागात एका गादी भांडाराच्या दुकानावर कामास असल्याचे समजले.

त्यानंतर पोलिसांनी या दुकानावर तळ ठोकत 22 मे 2019 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संशयित प्रेम पवार यास पकडण्यासाठी सापळा रचला.

पोलीस आल्याची चाहूल संशयितास लागताच त्याने तिथून पळ काढला. त्यानंतर फिल्मी स्टाईलने संशयिताचा एक किमी पाठलाग करून त्यास जेरबंद केले.

त्यानंतर त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने १७ एप्रिल रोजी दुपारी मित्र सद्दाम शेख याचा चांदवड बस स्टॅण्ड परिसरात रसवंती गृहात रस पिऊन बाहेर आलो.

त्यानतंर सद्दाम याने प्रेम पवार याचा मोबाईल घेतला तेव्हा सद्दाम याने पुन्हा मोबाईल दिला नाही या कारणावरून दोघांमध्ये वाद झाले, सद्दामने संशयित प्रेमची गच्ची पकडल्याचा राग आल्याने प्रेम पवार याने त्याचेकडील चॉपरने सद्दामचे छातीवर, पोटावर सपासप वार करून जिवे ठार मारले याबाबत त्याने कबुली दिली आहे.

स्थागुशाचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदिप दुनगहू, पोउनि स्वप्निल नाईक, सपोउनि अरूण पगारे, पोहवा संजय गोसावी, पोकॉ सुशांत मरकड, मंगेश गोसावी, सचिन पिंगळ, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांच्या पथकाने सदर खुनाचे गुन्हयातील आरोपीस गोवा राज्यातुन ताब्यात घेवुन कारवाई केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!